IMD Alert Today: महाराष्ट्र राज्यामध्ये पंजाब डख यांच्याकडून हवामानाचा अंदाज दिला जातो बऱ्याच वेळेस पंजाब डख यांचा हवामान अंदाज खरा ठरतो आणि त्यामुळे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होण्यापासून वाचते मुख्यतः अवकाळी पावसाळा आजचा हवामान अंदाज पंजाबराव यांनी दिला तर तो खरा होतो अशी शेतकऱ्यांची भावना आहे आणि आता पंजाबराव यांनी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे त्यामध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये कसा पाऊस पडणार आहे याविषयीची माहिती दिलेली आहे.
एका शेतकऱ्या सोबत बोलत असताना पंजाबराव यांनी ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याचा havaman andaj दिलेला आहे यामध्ये त्यांनी विविध जिल्हे आणि विभागांची माहिती दिलेली आहे त्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चला तर मग जाणून घेऊया पंजाबराव यांनी केलेला हवामान अंदाज.
IMD Alert Today: फेब्रुवारी महिन्यात गारपिटीचा इशारा
पंजाबराव डख यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये दहा तारखेपर्यंत वातावरण कोरडे राहण्याचा इशारा दिलेला आहे परंतु 11 तारखेपासून पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा आहे.
दरम्यान पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामध्ये अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा आहे. पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, पुसद, हिंगोली, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पाऊस येणार आहे.
मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाड्यामध्ये शेवगाव पर्यंत पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार आहे असे विचारल्यानंतर पंजाबराव यांनी सांगितले की 11, 12, 13 आणि 14 दरम्यान गारपिटचा इशारा फक्त पूर्व विदर्भाला देण्यात आलेला आहे. याचबरोबर बाहेरच्या राज्यांमध्ये छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
पंजाबराव यांनी सांगितले की दहा तारखेपासून वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि उन्हाचा पारा वाढणार आहे म्हणजेच उष्ण आणि ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन 11 तारखेपासून पाऊस पडू शकतो.
Punjab dakh havaman andaj
पंजाबराव यांनी पुढे बोलताना सांगितले की आता पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हरभरा काढणी चालू आहे ज्वारी काढणी तसेच गहू काढणे चालू आहे आणि येणाऱ्या पावसाचा फटका संबंधित पिकांना बसू शकतो.
पंजाबराव डख यांनी पावसाविषयीचे सोपे गणित समजून सांगितले की पाऊस येण्याच्या पाच दिवस आधी वाऱ्याची गती वाढलेली बघायला मिळते आणि आपल्याला वावटळ निर्माण होताना बघायला मिळतात. जर वावटळ निर्माण झाली तर पाच दिवसांनी पाऊस पडू शकतो हा निसर्गाचा नियम आहे असे त्यांनी सांगितले.
Punjab dak हवामान अंदाज व्हिडिओ
व्हिडिओ बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा ज्यामध्ये आजचा हवामान अंदाज या यूट्यूब चैनल वर पंजाबराव यांचा व्हिडिओ आहे –
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा