IMD update: पुढील 2 दिवस धुंवाधार पाऊस, अलर्ट जारी

IMD update: महाराष्ट्र राज्यामध्ये आता परत पावसाने हजेरी लावलेले बघायला मिळत आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे आणि वातावरणामध्ये देखील झपाट्याने बदल होत आहेत अशा परिस्थितीमध्ये भारतीय हवामान विभागाकडून परत एक हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहे व याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकण आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

16 आणि 17 सप्टेंबर रोजी हवामान विभागाकडून पुणे पालघर ठाणे रायगड आणि धुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे याचबरोबर मुंबईसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विविध जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे

16 सप्टेंबर रोजी जळगाव नंदुरबार अकोला नाशिक आणि वाशिम या जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. 18 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहे.

रविवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, नाशिक आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे घाटमाथ्याच्या परिसरावर आणि इतर भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

पुढे पाऊस पडणार की नाही बघा IMD update

सध्या कमी दाबाचे क्षेत्र हे पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होत आहे म्हणूनच आठवड्याच्या शेवटी महाराष्ट्र राज्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे.

भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सोमा सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाचे क्षेत्र आज पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये पाऊस पडू शकतो परंतु ईशान्य भारतामध्ये याचा प्रभाव कमी राहणार आहे तसेच गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये देखील वेगवेगळ्या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

दररोजचा हवामान अंदाज मोफतपणे व्हाट्सअप ग्रुप वर मिळवा

Rain forecast
Rain forecast: पुढील 24 तासात महाराष्ट्रात या जिल्ह्यात पावसाचा कमबॅक

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा