Havaman Andaj: पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज राज्यात पाऊस जोरदार कमबॅक करणार

Havaman Andaj: महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ठीक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे अजून पण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडलेला नाही त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे परंतु ज्या ठिकाणी पाऊस पडला अशा ठिकाणी शेतीच्या पिकांना नवीन जीवनदान मिळालेले आहे व शेतकरी आनंदात आहेत.

सध्या हवामान विभागाच्या हवामान तज्ञ मार्फत नवीन हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे ज्यानुसार दोन दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात ठीक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज त्यांनी दिलेला आहे याविषयी अधिक माहिती पुढे पाहूया.

Havaman Andaj: या भागांमध्ये पडणार पाऊस

सध्या महाराष्ट्र मध्ये पाऊस पडण्यासाठी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा कारणीभूत ठरत आहे तसेच अरबी समुद्रावरून समुद्रसपाटीपासून कमी दाबाचे वारे वाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र मान्सून सक्रिय होताना बघायला मिळत आहे. या वातावरणाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्यात रविवार पर्यंत सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील 48 तासांमध्ये पुण्याच्या घाटमाथ्याच्या परिसरावर तसेच मराठवाड्यामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सांगली आणि सोलापूर जिल्हा वगळता महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर धुळे आणि जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे शहर आणि पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये पुढील दोन दिवसांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच घाटमाथ्याच्या परिसरावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे

दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी व अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा