Havaman update: आज पासून पुढील तीन दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये जोरदार पावसाचे आगमन महाराष्ट्रात बघायला मिळू शकते. महाराष्ट्र मध्ये मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची हजेरी बघायला मिळेल.
भारतीय हवामान विभागाकडून विविध जिल्ह्यांना येलो तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच कोकणातील विविध जिल्ह्यांना पावसासाठीचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम होत असल्याचा हवामान अंदाज आहे.
पुढील 3 दिवस पावसाचे Maharashtra Rain Update
यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये अजून बऱ्याच भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाची आस लागली आहे. सध्याच्या एकंदरीत परिस्थितीमध्ये महाराष्ट्र मध्ये हवामान विभागाकडून याच पार्श्वभूमीवर हवामान अंदाज जारी करण्यात आला आहे व त्यामध्ये आज पासून पुढील तीन दिवस म्हणजेच 20 सप्टेंबर पर्यंत ठीक ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज महाराष्ट्र मधील ठाणे, पालघर आणि कोकणालगच्या घाटमाथ्याच्या परिसराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नाशिक, नंदुरबार, पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्गला आज पावसासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. जळगाव आणि धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र मध्ये ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, रायगड, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर रत्नागिरी साठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 18 सप्टेंबर नंतर 19 आणि 20 सप्टेंबर रोजी राज्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 आणि 20 सप्टेंबरला महाराष्ट्रात रायगड आणि रत्नागिरी येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी शेतकरी ग्रुप जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा