Havaman andaj: सध्या हवामानाची परिस्थिती पाहून आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राचे निरीक्षण करून हवामान विभागाकडून वेळोवेळी हवामान अपडेट केले जात आहेत यातील काही हवामान अपडेट करत आहेत तर काही हवामान अपडेट फेल जात आहेत अशातच हवामान विभागाकडून एक नवीन हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
हवामान विभाग कडून आज देखील काही जिल्ह्यांना हवामानाचा इशारा देण्यात आलेला होता त्यामध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित केलेल्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. उर्वरित महाराष्ट्र मध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहिल असा अंदाज होता.
Havaman andaj तीन दिवस पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाकडून उद्या देखील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हा यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. संबंधित जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने केलेला आहे तसेच उर्वरित महाराष्ट्र मध्ये ठिकाणी हलका, मध्यम पाऊस होऊ शकतो असे हवामान विभागाचे मत आहे.
हे वाचा: पुढील 3 दिवस कुठे पडणार जोरदार पाऊस? हवामान विभाग अंदाज
परवा दिवशी महाराष्ट्रात परभणी, हिंगोली, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाचे मार्फत देण्यात आलेला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल असे हवामान विभागाच्या अंदाजात सांगण्यात आले आहे. परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा प्रभाव जास्त राहिल असे हवामान विभागाचे मत आहे.
दररोजच्या हवामान अंदाज मिळण्यासाठी शेतकरी ग्रुप जॉईन करा.
हे पण वाचा :
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा