समतोल आहाराचे महत्व | Balance diet importance in Marathi

आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते आपल्याला म्हणतात की समतोल आहार घ्या! तसेच आपल्या शरीराच्या चांगल्या वाढीसाठी समतोल आहाराचे महत्त्व सर्वांनाच माहीत असते परंतु तुम्हाला माहित आहे का हे समतोल आहार म्हणजे काय व याचे नेमके काय महत्त्व आहे.

जर तुम्हाला समतोल आहार विषयी माहिती नसेल तर आजच्या या लेखामध्ये आपण समतोल आहाराचे महत्व व समतोल आहार म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या मनातील समतोल आहाराविषयी संपूर्ण शंका निघून जातील.

समतोल आहार म्हणजे काय

ज्या आहारामधून मानवी शरीराला कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ तसेच क्षार आणि जीवनसत्त्वे प्राप्त होतात अशा आहाराला समतोल आहार म्हटले जाते. समतोल आहाराच्या माध्यमातून मानवी शरीराच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक ऊर्जा प्रदान केली जाते.

आपण आपल्या आहारामध्ये भाजी, पोळी, भात तसेच इतर पदार्थ खात असतो त्याला आपण आहार असे म्हणतो. परंतु मानवी शरीरासाठी आवश्यक जीवनसत्व प्राप्त करण्यासाठी केल्या गेलेला आहाराला आपण समतोल आहार असे म्हणतो.

शरीराचे चांगले पोषण होण्यासाठी विविध अन्नघटक महत्त्वपूर्ण असतात. शरीरासाठी विविध अन्नघटक मिळवण्यासाठी संबंधित अन्नपदार्थ आपल्या आहारामध्ये असणे गरजेचे असते व असा परिपूर्ण आहार आपण संतुलित आहार म्हणून ओळखतो.

समतोल आहाराचे फायदे

1. समतोल आहारामुळे आपले आरोग्य सुधारते व आपले आयुष्यमान वाढण्यास मदत होते समतोल आहाराच्या मदतीने रोगांचा धोका कमी होतो तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढून कर्करोग, हृदयरोग तसेच मधुमेहाचे प्रमाण कमी होते

2. मानवी शरीरास कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते व मानवी ऊर्जा नियंत्रणेत राहण्यासाठी व ऊर्जेची पातळी समतोल राखण्यासाठी समतोल आहार मदत करते समतोल आहाराच्या मदतीने आपण दिवसभर सक्रिय राहून विविध कार्य करू शकतो.

3. समतोल आहार हे जास्त कॅलरी चा उपयोग करण्यापासून थांबवते त्यामुळे निरोगी वजन राहण्यास मदत होते

4. समतोल आहार च्या मदतीने ताण-तणाव तसेच चिंता कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते व निरोगी मनाची प्राप्ती होते.

समतोल आहार कसा घ्यावा

समतोल आहात घेत असताना आपल्याला काही उपयुक्त अन्न घटकांची आवश्यकता असते ज्यांचा उपयोग आपण आपल्या आहारात करणे गरजेचे असते ज्याविषयी अधिक माहिती पुढील प्रमाणे आहे:

प्रथिने: अंडी, मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ तसेच डाळीमधून आपल्याला प्रथिनांची प्राप्ती होऊ शकते प्रथिने हे आपल्या हाडांच्या बांधणीसाठी उपयुक्त असतात.

कर्बोदके: धान्य, ब्रेड, भाज्या, फळे तसेच पास्ता मधून शरीराला कार्बोदके प्राप्त होतात. कर्बोदके हे मानवी शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करतात

चरबी: मासे, तेल, चरबीयुक्त मांस, फळे, आणि दुधामधून चरबी प्राप्त होते. चरबीचा उपयोग स्नायू ऊर्जा आणि हार्मोन तयार करण्यासाठी होतो.

जीवनसत्त्वे आणि खनिजे: फळे, भाज्या, धान्य आणि दुधाच्या पदार्थांमधून जीवनसत्वे आणि खनिजे प्राप्त होतात. शारीरिक कार्यांसाठी जीवनसत्वे आणि खनिजांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

समतोल आहाराच्या काही टिप्स

• आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा समावेश करा

• नियमित समतोल आहार घ्या

• भाज्यांचा तसेच फळांचा आहारामध्ये भरपूर उपयोग करा

• संपूर्ण प्रकारचे धान्य खा

• दूध युक्त पदार्थांचे सेवन करा

• प्रक्रिया केलेल्या मांस तसेच लाल मांस चा उपयोग टाळा

• सोडा असलेले पदार्थ खाऊ नका व साखर युक्त पेयजल चा उपयोग करू नका

सारांश

समतोल आहाराचे महत्व आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेतले तर तुम्हाला समतोल आहार विषयी कोणत्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता तसेच जर हा लेख आवडलेला असेल तर हा लेख पुढे शेअर करा व आमचे इतर लेख देखील वाचा

हे पण वाचा:

पपई खाण्याचे फायदे आणि तोटे

जांभूळ खाण्याचे फायदे आणि तोटे

मूळव्याध म्हणजे काय? मूळव्याध वर घरगुती उपाय

जाड होण्यासाठी काय खावे

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा