मकाचे कणसे पोखरणारी अळी (लष्करी अळी) ची लक्षणे आणि व्यवस्थापन

मकाचे कणसे पोखरणारी अळी (लष्करी अळी) – मका पिकामध्ये सर्वात जास्त नुकसान करणारी व डायरेक्ट कणसांवर अटॅक करणारी अळी म्हणजे मकाचे कणसे पोखरणारी अळी जिला आपण लष्करी अळी म्हणून देखील ओळखतो. या अळीमुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व मकाच्या दाण्यांची गुणवत्ता बिघडते तसेच मकाच्या चाऱ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

मकाचे कणसे पोखरणारी अळीचे शास्त्रीय नाव Helicoverpa armigera आहे. ही अळी मका बरोबर विविध पिकांवर आढळते जसे की ज्वारी, ऊस इत्यादी.

मकाचे कणसे पोखरणाऱ्या अळीचे वैशिष्ट्य

मकाचे कणसे पोकरणारी अळी पहिल्यांदा कणीसाचे स्त्री केसर खाते व त्यानंतर कणसाच्या आत मध्ये जाऊन दाण्यांवर भक्ष करते.

मकाची कणसे पोखरणाऱ्या लष्करी अळी विषयी माहिती

1. या अळीची मादा एका वेळेस ३५० किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते त्यानंतर तीन ते पाच दिवसात अळी बाहेर येतात

2. अळी ही हिरव्या रंगाची असते जिच्यावर राखाडी स्वरूपाच्या लाईन असतात

3. अळीचा पतंग हा राखाडी रंगाचा असतो ज्याच्या पाठीमागे पंखांशेजारी V आकार बनलेला असतो.

कणसे पोखरणाऱ्या लष्करी अळीचे व्यवस्थापन

1. ट्रायकोग्रामा चीलोनिस हे आठ कार्ड प्रति हेक्टर या प्रमाणात मकाच्या शेतात सोडावे

2. मका उगवल्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने निंबोळी अर्काची फवारणी करावी

3. रासायनिक नियंत्रणामध्ये आपण इमामेक्टिन बेंजोएट या रसायनाचा उपयोग करू शकतात.

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा