आता बिपरजॉय चक्रीवादळाबाबत हे गुजरात पासून ५०० ते ६०० किलोमीटर अंतरावर आहे व ते गुजरातला धडकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात हवामान विभागाकडून हवामान अपडेट देण्यात आलेले आहे.
मुंबईच्या हवामान विभागाच्या सुनील कांबळे यांच्यानुसार जेव्हा चक्रीवादळ दडकेल तेव्हा मुंबईमध्ये वाऱ्याची गती ताशी 55 मध्ये 60 असेल. पुढील 48 तासात मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागामार्फत नोंदवण्यात आलेला आहे.
IMD: हवामान विभागाकडून बिपरजॉय चक्रीवादळाबद्दल महत्त्वाची अपडेट, समुद्र तटावर सतर्कतेचा इशारा
जुनागड द्वारका मोरंबी पोरबंदर राजकोट जामनगर आणि कच्छ या भागांमध्ये 14 आणि 15 जूनला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नोंदवण्यात आली आहे. हे सगळे जिल्हे बिपरजॉय चक्रीवादळामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे.
कांडला पोर्ट तसेच जामनगरच्या तेल रिफायनरी ला या चक्रीवादळामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे तसेच गुजरात मध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना बघायला मिळत आहे तसेच रविवारी महाराष्ट्रात मान्सून ने आगमन केले आहे. पुढील 48 तासांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मान्सून व्यापण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार जोपर्यंत महाराष्ट्र मध्ये 50 ते 60 मिलिमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मच्छीमारांसाठी देखील हवामान विभागाने आवाहन केलेले आहे की जोपर्यंत हे चक्रीवादळ चालू आहे तोपर्यंत मच्छीमारांनी समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये. समुद्र शांत होईपर्यंत गणपतीपुळे चा समुद्र तट सर्व पर्यटकांसाठी बंद राहील अशी माहिती समोर येत आहे.
हवामान अंदाज साठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा