PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता जाहीर; या व्यक्तींना नाही मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ

PM Kisan Yojana: केंद्र सरकारमार्फत चालवण्यात येणारी एक नाविन्यपूर्ण योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही निश्चित रक्कम दिली जाते म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसान सन्मान निधी मार्फत देण्यात येतात. पी एम किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी जारी करण्यात आला आहे.

पी एम किसान सन्मान निधीचा लाभ देशातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. पी एम किसान सन्मान निधीच्या चौदाव्या हप्त्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील सिकर येथून केली. प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे महाराष्ट्रातील 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आहे.

PM Kisan Yojana : या महिन्यांमध्ये मिळतो पीएम किसान चा हप्ता

दरवर्षी पी एम किसान योजनेचा हप्ता वर्षातून तीन वेळा दिला जातो म्हणजेच वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. पी एम किसान योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिना दरम्यान पाठवला जातो तसेच पीएम किसन योजनेचा दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात पाठवला जातो व तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या महिन्याच्या दरम्यान पाठवला जातो.

फक्त याच लोकांना मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ

ज्या शेतकऱ्यांनी जमिनीचे नाव नोंदणी केलेली आहे व या योजनेसाठी अधिकृत वेबसाईटवरून अर्ज केलेला आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी नोंदी करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेले स्थानिक अधिकारी, नोडल अधिकारी व महसूल अधिकारी शेतकऱ्यांची नोंदी करत आहेत. जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही तुमचे नाव pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर चेक करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या चौदाव्या हफ्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.

शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र सरकार मार्फत किसान सन्मान योजना अमलात आली आहे. जेव्हा या योजनेची सुरुवात करण्यात आली तेव्हा फक्त अल्प आणि अल्पत्य भूधारक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता परंतु नंतर यामध्ये सुधारणा करून देशातील बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे.

या शेतकऱ्यांना नाही मिळणार पीएम किसान सन्मान निधीचा लाभ

घटनात्मक पदांवर बसलेले शेतकरी कुटुंब, संस्थात्मक जमीनधारक, केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये सेवा करत असलेले अधिकारी तसेच कर्मचारी, स्वायत्त संस्थांचे कर्मचारी तसेच अधिकारी, वकील, डॉक्टर, इंजिनिअर तसेच व्यवसायिक, दहा हजारांपेक्षा जास्त निवृत्तीवेतन असलेले कर्मचारी, त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी मागील वर्षामध्ये आयकर भरला आहे अशा व्यक्तींना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेले आहे.

Havaman andaj

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा