डाळिंबावरील तेल्या रोगाची लक्षणे आणि उपाययोजना

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत डाळिंब पिकावरील प्रामुख्याने येणारे रोग त्यामध्ये डाळिंब तेलकट डाग रोग यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोप लागवधीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे

या रोगाचे प्रसार कमी करण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना करणे फार महत्वाचे आहे.

आज आपण जाणून घेऊया या लेखातून तेल्या रोगाचे एकात्मिक रोग व्यवस्थापन कसे करायचे. डाळिंब पिकावरील बॅक्टेरियल ब्लाईट रोग म्हणजेच तेल्या या नावाने ओळखला जातो. हा रोग Zanthomonas या जिवाणूमुळे होतो हा जीवाणूजन्य रोग आहे .

तेल्या रोगाची लक्षणे

तेल्या रोगाची लक्षणे प्रामुख्याने पानांवर तसेच फुलांवर , खोडावर आणि फळांवर दिसतात.

फळ

फळांवर सुरुवातिला छोटे छोटे तेलकट पानथळ डाग दिसतात काही दिवसांनी ते डाग काळपट तपकिरी दिसतात. फळांवर आडवे उभे तडे जातात. फळांवर लहान लहान डाग एकत्र येऊन त्याचे मोठ्या डागात रूपांतर होते. तडे मोठे झाल्यावर फळे गळून पडतात

फुल

कळ्यांची व फुलांची गळ होते. फुलांवर व कळ्यांवर काळपट डाग दिसतात

खोड

खोडांवर आणि फांद्यांवर सुरुवातीला तेलकट डाग दिसतात काही काळानंतर ते डाग तपकिरी होतात खोडावर खाच तयार होते व ते झाड तिथून मोडते. तेल्या रोगाचे प्रमाण अधिक असल्यास फांद्या डागापासून मोडतात.

पान

सुरुवातीच्या पानांवर तेलकट छोटे डाग दिसतात. काही काळा नंतर ते डाग काळपट होतात. जर हे डाग उन्हात पाहिले की तेलासारखे चमकतात. पाने पिवळी पडून गळून जातात

तेल्या रोगाचा प्रसार

या रोगाचा प्रसार प्रामुख्याने जिवाणूजन्य माती पासून बनवलेल्या रोपाद्वारे होतो. या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी रोग मुक्त रोपांची लागवड करावी.

रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगट डागांवरून पडणारे थेंब, हवा यांच्याद्वारे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसार होतो.

छाटणी करताना निर्जंतीकरण न करता वापरण्यात येणारे अवजारे यांच्यामुळे होतो. हे जीवन झाडाच्या उपग्रहस्त जमिनीमध्ये आठ महिने पेक्षा अधिक काळ राहू शकते.

तेल्या रोगाचे नियंत्रण व उपाययोजना

1) या रोगाचा नियंत्रण करायचे असेल तर निरोगी रोपांची लागवड करावी.

2) तेल्या रोगाच्या डागावरून उडणारे पाण्याच्या थेंबातूनही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसार होतो त्यामुळे फवारणी टाळाव्यात.

3) सरी किंवा पाठ पद्धतीने दिलेल्या पाण्यामुळे या रोगाचा प्रसार जलद होतो त्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा

4) डाळिंब झाडांमध्ये अंतर कमी असल्यास झाडांचा एकमेकांच्या संपर्कात येतो त्यामुळे रोगाचे प्रसार जलद होते म्हणून लागवडीचे अंतर 4.5 – 3 मी असावे.

5) फळे काढणी झाल्यावर बागेला दोन ते तीन महिने विश्रांती द्यावी.

6) डाळिंब बागेमध्ये स्वच्छता ठेवणे

7) रोगट बागेचे छाटणी झाल्यावर सर्व पाने फांद्या फळे यांचे अवशेष बागाच्या बाहेर नेऊन नायनाट करणे

8) छाटलेल्या भागांना बोर्ड पेस्ट मिसळून फवारावे.

9) पिकाच्या विश्रांतीच्या काळात निंबोळी पेंड व गांडूळ खत यांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा .

10) हस्त बहारात रोगाची तीव्रता कमी असते त्यामुळे हस्त बहार याची निवड करावी.

11) पालवी फुटल्यानंतर 1 किलो मोरचूर + 1 किलो चुना 100 लिटर पाणी करून फवारावे.

जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर हा लेख शेअर करा व काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट मध्ये मेंशन करा.

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा