डाळिंब पिकातील फळकुज व काळे ठिपके : लक्षणे आणि उपाय

अल्टरनेरिया काळे ठिपके व फळकूज ( Alternaria Black Spot and Fruits Rot )

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या लेखांमध्ये डाळिंब पिकावरील काळे डाग व फळकुज या रोगाबद्दल सर्वस्तर माहिती मिळवणार आहे हा डाळिंब पिकावरील प्रामुख्याने आढळणारा रोग आहे या रोगामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात घट होत आहे. काळे डाग व फलकुज या नावाने हा रोग ओळखला जातो.

महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी डाळिंब पीकची लागवड केली जाते व डाळिंबमध्ये Alternaria black spot and fruits Rot प्रामुख्याने आढळतो या रोगाचे शास्त्रीय नाव हे Alternaria alternata आहे.

फळकुज व काळे ठिपके रोगाची लक्षणे

1)पानांवर व फळांवर छोटेसे लालसर तपकिरी गोल डाग दिसतात.

2)झाडाची हिरवी पाने पिवळी पडतात.

3) फळांचा बाहेरचा भाग कुजू लागतो. मात्र आतील भागाला काहीच नुकसान पोहचत नाही.

4) कालांतराने छोटे डागचे रूपांतर मोठे डागामध्ये होते.

5) रोगाच्या प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास हे डाग एकामेकांत मिसळून लांबाचे लांब धब्बे तयार होतात.

6) पाने पिवळी पडतात व पाने गळतात.

फळकुज व काळे ठिपके रोगाचा प्रसार

अल्टरनेरिया अल्टरनेटा या बुरशीचा प्रसार बुरशीजन्य रोपात, सुकलेल्या फळात किंवा जमिनीत राहणाऱ्या बुरशीपासून होतो.

अल्टरनेरिया बुरशीमुळे फळांवर काळ्या डागाची व फळांमधील गाभा कुजण्याची लक्षणे दिसू शकतात. वारंवार पडणारा पाऊस किंवा अनुकूल वातावरण या रोगास प्रसारास अनुकूल ठरते.

डाळिंबातील फळकुज व काळे ठिपके नियंत्रण

प्रतीबंधक उपाय

1)निरोगी रोपांची लागवड करावी

2) बागेमध्ये स्वच्छता ठेवावी

3) बुरशी ग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावी.

4) जुने फळे आणि फांद्या शेतातून काढून टाकणे.

5) रोपांचा नैसर्गिक प्रतिकार जोपासण्यासाठी आपल्या पिकांना योग्य प्रमाणात खते द्यावी.

फळकुज व काळे ठिपके जैविक नियंत्रण

अल्टरनेरिया अल्टरनेटा या बुरशीचा उपचार करण्यासाठी जैविक उपचार दिसत नाही तरीपण कॉपर ऑक्सिक्लोराईड या घटक असणारे बुरशीनाशक प्रभावी करू शकते.

डाळिंब पिकातील फळकुज व काळे ठिपके रासायनिक नियंत्रण

Mancozeb,Propineb, Ziram,Copper oxychloride,captan,propiconazole,chlorothalonil, difenoconazole घटक असणारे या रोगावर उत्तम परिणाम देते.

आज आपण या लेखातून जाणून घेतले की अल्टरनेरिया काळे टिपके व फळकुज या रोगाचे नियंत्रण कशाप्रकारे करू शकतो तरी हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा जर तुम्हाला काही शंका असेल तर लगेच कमेंट करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा