Rain update Maharashtra: महाराष्ट्र राज्य मध्ये पावसाने दडी मारलेली आहे ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपत आलेला असला तरीही बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे व पिके तानाला येऊन काही शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जाण्याची चिंता वाढलेली आहे. म्हणूनच आजच्या या लेखात कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार आहे व कधी पावसाला सुरुवात होईल याविषयी माहिती जाणून घेऊया.
राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने दडी मारलेली असताना हवामान विभागाने पुढील 4 दिवसांचा हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे ज्यामध्ये पुढील चार दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आस हिमालयाच्या दिशेने गेल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कमी झालेला आहे. समुद्र सपाटीपासून एक किलोमीटर उंचीवर वारे वाहत आहेत.
Rain update: महाराष्ट्रात पुढील चार दिवसात पडणार का चांगला पाऊस
आज हवामान विभागाकडून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकण विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उर्वरित महाराष्ट्र राज्यांमध्ये ऊन सावल्यांचा खेळ सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.
पुढील चार दिवस महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने सांगितलेले आहे.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा