Havaman andaj: महाराष्ट्रात पुढील 4 दिवस कोणताही अंदाज नाही, हवामान विभागाची माहिती

Havaman andaj: महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत असताना बघायला मिळत आहे अशातच भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल असा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे. आता हवामान विभागातर्फे नवीन हवामान अंदाज देण्यात आलेला आहे.

Havaman andaj | महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, उडीसा, छत्तीसगड आणि नागालँड या राज्यांव्यतिरिक्त उर्वरित भारतात पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळत आहे महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे.

महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कमी असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात तीन ते चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील.

पुढच्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्याला येलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. सोमवारपासूनच मुंबईमध्ये पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता नाही. येत्या चार-पाच दिवसांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे असे प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे. दक्षिण भारतात तसेच मध्य भारतात देखील कमी पावसाची शक्यता आहे.

10 ऑगस्टपर्यंत कोकण विभागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असे प्रतिपादन हवामान विभागात मार्फत करण्यात आलेले आहे तसेच उर्वरित राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेत पावसाचा जोर कमी राहील.

दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा

Punjab Dakh

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा