आरक्षण म्हणजे काय | What is Reservation in Marathi

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे परंतु तुम्हाला माहित आहे का आरक्षण म्हणजे काय व कोणत्या प्रवर्गातील व्यक्तींना किती आरक्षण आहे. त्यामुळे आजच्या या लेखात आपण आरक्षण म्हणजे काय तसेच इतर महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

भारतीय संविधानामध्ये आरक्षणाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे व आरक्षणाचा मुख्य उद्देश हा समाजातील मागे पडलेला घटकांना समाजाबरोबर आणून भारताची सामाजिक प्रगती करणे आहे.

आरक्षण म्हणजे काय – What is reservation in Marathi

आरक्षण म्हणजे समाजातील विशिष्ट गटातील लोकांना समाजाच्या इतर गटातील लोकांपेक्षा काहीशा अधिक संधी देण्याची कायदेशीर प्रक्रिया. आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास व्यक्तींना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून मदत केली जाते.

भारतीय संविधान मधून विविध जातीच्या व्यक्तींना SC, ST तसेच ओबीसी प्रवर्गाच्या माध्यमातून आरक्षण प्रदान केले जाते व संबंधित प्रवर्गातील व्यक्तींना शैक्षणिक तसेच नोकरीमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून सहाय्य केले जाते.

आरक्षणाची उद्दिष्टे

भारतात आरक्षणाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:

1. समाजामध्ये समान समता सुनिश्चित करण्यासाठी तसेच सामाजिक न्याय प्रदान करण्यासाठी आरक्षण हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे आरक्षणामुळे आर्थिक दृष्ट्या तसेच सामाजिक दृष्ट्या मागास गटाच्या लोकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी संधी प्राप्त होते

2. भारतातील असमानता कमी करण्यासाठी आरक्षण हे महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते हे आर्थिक दृष्ट्या तसेच सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या गटाच्या लोकांना जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करते

3. आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागास गटाच्या लोकांना क्षमता आणि कौशल्य विकास करण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक विकासाला आणि सामाजिक विकासाला गती देण्यासाठी आरक्षण महत्त्वाची भूमिका पार पाडते.

4. नोकरीमध्ये तसेच शिक्षणामध्ये मागास गटातील व्यक्तींना समान संधी प्राप्त करून देण्यासाठी आरक्षणाची मदत होते.

आरक्षणाचे प्रकार

आरक्षणाचे मुख्य दोन प्रकार आहेत:

1. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती साठी आरक्षण

2. इतर मागासवर्गीय साठी आरक्षण

महाराष्ट्र मध्ये अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीसाठी 15 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे तसेच इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी साठी 50 टक्के आरक्षणाचे तरतूद आहे.

भारतीय आरक्षणाने अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना आणि इतर मागासवर्गीय मधील उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षित जागा प्रदान केलेला आहेत.

महाराष्ट्र मधील अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीसाठी चे आरक्षण हे संविधानाने तरतूद करून प्रदान केलेले आहे तर इतर मागासवर्गीयांसाठी देण्यात आलेले आरक्षण हे महाराष्ट्र गव्हर्मेंट ने तरतूद करून प्रदान केलेले आहे परंतु आता नवीन घटकांना आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टाची मदत घ्यावी लागते.

भारतीय आरक्षण प्रणाली

भारतामध्ये आरक्षणाचे अनेक विरोधक आहे तसेच अनेक समर्थक देखील आहेत समर्थकांच्या दृष्टीने आरक्षण हे समता आणि सामाजिक न्याय व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संसाधन आहे तसेच विरोधक असे दावे करतात की आरक्षणामुळे गुणवत्ता खालवत चालली आहे व त्यामुळे सामाजिक भेदभाव वाढत आहेत.

भारतामध्ये आरक्षण संबंधित भविष्यामध्ये अनिश्चितता दिसत आहे कारण काही लोकांचा असा विश्वास आहे की आरक्षणाचे प्रमाण कमी केले पाहिजे तर काही लोकांना असे वाटत आहे की अधिक प्रमाणात आरक्षण प्रदान केले पाहिजे जेणेकरून समाजातील इतर घटकांना देखील आरक्षणाचा लाभ मिळेल.

आरक्षणाचे फायदे

महाराष्ट्र मध्ये आरक्षणाचे अनेक फायदे आहेत. आरक्षणामुळे आर्थिक दृष्ट्या तसेच सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या गटाच्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये अधिक चालना मिळण्यास मदत होते व त्यांना यशस्वी होण्यास मदत होते. आरक्षणामुळे समता, न्याय तसेच सामाजिक स्वातंत्र्य प्रदान होते व असमानता कमी होण्यास मदत होते आणि आर्थिक तसेच सामाजिक विकासाला गती मिळते.

आरक्षणाचे तोटे

आरक्षणाच्या फायद्यांप्रमाणेच आरक्षणाचे काही तोटे देखील आहे. आरक्षणामुळे शैक्षणिक तसेच सामाजिक जीवनातील गुणवत्ता कमी होऊ शकते कारण योग्य व्यक्तींना प्रवेश आणि पदे नाकारले जाऊ शकतात तसेच आरक्षणामुळे समाजातील भेदभाव वाढू शकतो कारण इतर गटातील लोकांना आरक्षणामुळे कमी संधी प्राप्त होऊ शकतात.

सारांश

मला आशा आहे तुम्हाला आजच्या या लेखामधून आरक्षण म्हणजे काय तसेच आरक्षणाचे फायदे आणि तोटे आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती समजलेली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडलेला असेल तर हा लेख आता शेअर करा व जर या लेखात काही त्रुटी आढळल्या असतील किंवा काही सुधारणा आवश्यक असतील तर लगेच खाली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा.

हे पण वाचा:

जलसंपदा विभाग भरती पात्रता 

साखळी उपोषण म्हणजे काय, वाचा सविस्तर

वेबसाईटचे डोमेन नेम म्हणजे काय असते

होस्टिंग म्हणजे काय

नोट: संबंधित माहिती इंटरनेट वरील उपस्थित स्त्रोतांच्या आधारे घेण्यात आले आहे त्यामुळे माहितीचा उपयोग करण्यात आली संबंधित माहितीची स्वतः खात्री जमा करा

1 thought on “आरक्षण म्हणजे काय | What is Reservation in Marathi”

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा