IMD alert: मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सध्या हवामान विभागाकडून पुढील तीन दिवसांसाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट काही जिल्ह्यांना लागू करण्यात आला आहे.
आज महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ भागांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भामधील अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना पाऊस पडण्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण विभागामधील सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई तसेच दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खानदेशामध्ये जळगाव व मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर तसेच कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या काही भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार महाराष्ट्रात याच तारखेपासून परतीचा पाऊस सुरू होणार
उद्या आणि परवा देखील महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मागील दोन दिवस चांगला पाऊस पडला परंतु आज ठिकठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ बघायला मिळाला. आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दररोजच्या हवामान अंदाज व्हाट्सअप ला मिळवण्यासाठी शेतकरी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
1 thought on “पुढील 3 दिवसांत 14 जिल्ह्यांत धुंवाधार पाऊस, हवामान विभाग”