काळानुसार मार्केटिंग पद्धतीमध्ये मोठे बदल होत गेले आहे. जेव्हा इंटरनेट ची सुरुवात झालेली नव्हती किंवा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला वृत्तपत्रांद्वारे, टीव्ही आणि प्रेस द्वारे मार्केटिंग केलेली बघायला मिळत होती. परंतु आता इंटरनेटचा प्रचार प्रसार वाढल्यामुळे डिजिटल मार्केटिंग ची मागणी वाढली आहे. म्हणूनच आपण आजच्या लेखात डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तसेच डिजिटल मार्केटिंग विषयी इतर माहिती जाणून घेऊ.
डिजिटल मार्केटिंग चा आजच्या काळामध्ये मार्केटिंग मध्ये मोलाचा वाटा आहे भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यामुळे डिजिटल मार्केटिंग करणारे व्यक्तींची देखील मागणी वाढत आहे. आपण डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून एक चांगले करिअर निर्माण करू शकतो तसेच आपण डिजिटल मार्केटिंग मधून आपल्या व्यवसायाची सुरेख जाहिरात करू शकतो.
या लेखात काय आहे:
चला तर मग प्रथम आपण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय व डिजिटल मार्केटिंग ची व्याख्या जाणून घेऊया.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय | What is Digital Marketing In Marathi
डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटच्या साह्याने व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांशी जोडण्यासाठी करण्यात आलेली मार्केटिंग पद्धती. डिजिटल मार्केटिंग ला ऑनलाईन मार्केटिंग असे देखील म्हटले जाते.
डिजिटल मार्केटिंग मध्ये वेगवेगळे सामाजिक माध्यम, वेबसाईट, फोरम, ई-मेल तसेच इतर डिजिटल संसाधनांच्या मदतीने मार्केटिंग केली जाते. म्हणजेच ज्या मार्केटिंग पद्धतीमध्ये डिजिटल चैनल चा उपयोग करून मार्केटिंग केले जाते अशा मार्केटिंग ला डिजिटल मार्केटिंग म्हटले जाते.
डिजिटल मार्केटिंग चा उपयोग दोन प्रकारे केला जाऊ शकतो एका प्रकारामध्ये व्यवसाय आपल्या उपयुक्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करतात व दुसऱ्या प्रकारांमध्ये काही व्यवसाय हे दुसऱ्या व्यवसायांना सेवा पुरवण्याचे कार्य करत असतात, अशा वेळेस ते डिजिटल मार्केटिंग चा उपयोग आपल्या कार्यप्रणाली निगडित व्यवसायांना जोडण्यासाठी करतात.
डिजिटल मार्केटिंग चे प्रकार ~ Types of digital marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग चा प्रकार | विशेषता आणि माहिती |
ई-मेल मार्केटिंग | ई-मेल मार्केटिंग मध्ये संभाव्य ग्राहकांना ई-मेल पाठवले जातात व त्याद्वारे आपल्या व्यवसायाची जाहिरात केली जाते. ई-मेल च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मार्केटिंग ला ईमेल मार्केटिंग म्हणतात |
Affiliate मार्केटिंग | अफिलिएट मार्केटिंग मध्ये जेव्हा एखादा व्यक्ती किंवा संस्था आपले उत्पादन विकण्यासाठी मदत करते तेव्हा आपण त्याला कमिशनच्या स्वरूपात काही रक्कम देत असतो. उदाहरणार्थ ॲमेझॉन अफिलिएट मध्ये जेव्हा आपण ॲमेझॉन ची एखादी वस्तू रेफर करून विकण्यास मदत करतो तेव्हा ॲमेझॉन आपल्याला कमिशन मिळते. |
कंटेंट मार्केटिंग | चित्र किंवा अक्षरांच्या स्वरूपातील किंवा ऑडिओ व्हिडिओ स्वरूपातील वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पाठवून कंटेंट मार्केटिंग केली जाते |
पे पर क्लिक मार्केटिंग | जेव्हा आपण गुगल किंवा फेसबुक मध्ये पैसे देऊन ॲड्स लावतो तेव्हा त्याला आपण पे पर क्लीक मार्केटिंग असे म्हणतो. या प्रकारच्या मार्केटिंग मध्ये जेव्हा संभाव्य ग्राहक किंवा कस्टमर आपल्या ऍड वरती क्लिक करेल तेव्हाच आपल्याला पैसे द्यावे लागतात |
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन | गुगल किंवा अन्य सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉक वरती ट्राफिक आणून त्याच्या मार्फत जी मार्केटिंग केली जाते त्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असे म्हणतात. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये आपल्या वेबसाईटची रँकिंग जितकी वर असेल तितका जास्त फायदा होतो. |
सोशल मीडिया मार्केटिंग | वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यांच्या वरती पोस्ट टाकून आपल्या व्यवसायासाठी मदत करणाऱ्या मार्केटिंग ला सोशल मीडिया मार्केटिंग म्हणतात. सोशल मीडिया मार्केटिंग मुळे चांगले कस्टमर मिळण्यास फायदा होतो. |
मार्केटिंग एनेलिटिक्स | जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग करत असतो तेव्हा जर आपण पैसे देऊन एड्स लावलेले असतील अशा वेळेस मार्केटिंग ऍनॅलिटीस आपल्याला मदत करते मार्केटिंग ऍनॅलिटीच्या मदतीने विजिटर किती वेळा आपल्या लिंक वर क्लिक करत आहे व कोणत्या पेजेस वरती जात आहे हे बघणे गरजेचे ठरते व त्यावरून पुढील डिजिटल मार्केटिंगची रूपरेषा आखली जाते. |
मोबाईल मार्केटिंग | सध्या जगभरात मोबाईल वापरकर्त्यांची संख्या अत्यंत तीव्र गतीने वाढत आहे म्हणूनच मोबाईल वापरकर्त्या व्यक्तींना मार्केटिंगच्या माध्यमातून टार्गेट करण्यासाठी मोबाईल मार्केटिंग चा उपयोग होतो. सध्याच्या काळात मोबाईल मार्केटिंग करणे गरजेचे ठरत आहे. |
डिजिटल मार्केटिंग ची विशेषता
1. डिजिटल मार्केटिंग मध्ये आपल्याला आपले ग्राहक शोधण्यासाठी प्रबळ मुबलकता मिळते
2. डेटा अनालिसिस आणि इतर ऑनलाइन टूल च्या मदतीने आपण डिजिटल मार्केटिंग करण्याआधी संबंधित मार्केटिंगचे संभाव्य परिणाम जाणून घेऊ शकतो.
3. डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण एका विशिष्ट ग्राहक वर्गाला टार्गेट करू शकतो व आपल्या व्यवसायाची अधिक चांगल्या प्रकारे जाहिरात करू शकतो.
4. डिजिटल मार्केटिंग मध्ये केलेल्या मार्केटिंग चे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेणे शक्य होते.
5. आपण आपल्या डिजिटल मार्केटिंग कॅम्पिंग ला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे हे जाणून घेऊ शकतो व कमेंट आणि इतर माध्यमाद्वारे ग्राहकांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतो.
6. जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग करतो तेव्हा एक ग्राहक मिळवण्यासाठी आपल्याला किती रुपये खर्च झाला हे लगेच समजते.
7. डिजिटल मार्केटिंग च्या साह्याने आपल्याला प्रत्येक एक ग्राहक प्राप्त करण्यासाठी किती रुपये खर्च करावे लागतील याचा अंदाज बांधता येतो.
8. आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या मार्फत डिजिटल मार्केटिंग करू शकतो जसे की सोशल मीडिया, वेबसाईट, यूट्यूब, ॲप्स, इत्यादी
9. पारंपारिक मार्केटिंगच्या तुलनेत आपल्याला डिजिटल मार्केटमध्ये अधिक चांगले परिणाम मिळतात.
10. वेगवेगळे डिजिटल मार्केटिंग चे कार्य आपण ऑटोमॅटिक पद्धतीने करू शकतो जसे की ईमेल कॅम्पिंग, एड्स टारगेटिंग इत्यादी
11. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण पैसे भरून आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकतो.
डिजिटल मार्केटिंग चा फायदा
1. डिजिटल मार्केटिंग च्या मदतीने आपल्या व्यवसायाचे ब्रँड मध्ये रूपांतर करणे सोपे होते
2. डिजिटल मार्केटिंग च्या साह्याने कमी खर्चात चांगली मार्केटिंग करणे शक्य होते
3. जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग करतो तेव्हा ग्राहकांचा आपल्यावरील विश्वास वाढावा यासाठी आपण डिजिटल चैनल च्या मदतीने त्यांच्याशी संवाद साधू शकतो
4. जेव्हा कोणताही ग्राहक डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतो तेव्हा आपण प्रत्येक स्टेप मध्ये त्यांच्याशी संवाद साधू शकतो व गरज पडल्यास त्यांची मदत करू शकतो
5. डिजिटल मार्केटिंग च्या साह्याने सातत्याने नवनवीन ग्राहक मिळवणे व व्यवसाय वाढवणे शक्य होते
6. डिजिटल मार्केटिंग मध्ये मार्केटिंग साठी लागणारा पैसा हा कमी असतो
7. डिजिटल मार्केटमध्ये विजिटर चे ग्राहकांमध्ये रूपांतरित करणे काहीसे सोपे जाते
8. कमी वेळेत जर मोठा बिझनेस बनवायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग त्यामध्ये मोलाची भूमिका निभवते
डिजिटल मार्केटिंग चे तोटे
1. डिजिटल मार्केटिंग द्वारे ब्रँड बनवणे सोपे झाले असले तरी त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे.
2. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी टेक्निकल गोष्टींचे ज्ञान व स्किल्स असणे गरजेचे ठरते
3. जर डिजिटल मार्केटिंग करताना व्यवस्थित काळजी घेतली नाही तर वेळ आणि पैशाचे नुकसान होते
4. वेगवेगळ्या जाहिराती ब्लॉक करणाऱ्या टूल मुळे उपयुक्त ग्राहक पर्यंत पोहोचणे अवघड होते
5. डिजिटल मार्केटिंग मध्ये स्वतःच्या ज्ञानामध्ये सातत्याने वाढ करणे गरजेचे ठरते
6. गुगल तसेच इतर सामाजिक माध्यमांमध्ये आलेल्या अपडेट चा डिजिटल मार्केटिंग वर परिणाम होतो
7. डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने कधीकधी चांगले रिझल्ट मिळण्यास वेळ लागतो व वेळखाऊ प्रक्रिया बनते
सर्वात जास्त विचारलेले प्रश्न
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
वेगवेगळ्या डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून केलेल्या मार्केटिंग ला डिजिटल मार्केटिंग असे म्हटले जाते. डिजिटल मार्केटिंग माध्यमांमध्ये वेबसाईट, ॲप्स आणि इतर ऑनलाइन चैनल चा समावेश होतो.
डिजिटल मार्केटिंग चा जनक कोण आहे?
फिलिप कोटलर यांना डिजिटल मार्केटिंग चे जनक असे मानले जाते.
डिजिटल मार्केटिंग मधील 3C कशाला म्हटले जाते?
डिजिटल मार्केटिंग मधील 3C हे कन्टेन्ट, क्रिएटिव्हिटी आणि कॉमन सेन्स हे आहेत
डिजिटल मार्केटिंग कशी शिकावी?
डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी आपण वेगवेगळ्या संसाधनांचा उपयोग करू शकतो ज्यामध्ये युट्युब, udemy यांचा समावेश होतो तर ऑफलाइन पद्धतीने शिकण्यासाठी वेगवेगळे डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट अस्तित्वात आहेत
आपण एक महिन्यांमध्ये डिजिटल मार्केटिंग शिकू शकतो का?
आपण एक महिन्यांमध्ये डिजिटल मार्केटिंग विषयी सामान्य संकल्पना शिकू शकतो परंतु चांगल्या प्रकारे डिजिटल मार्केटिंग मधून परिणाम मिळवण्यासाठी आपल्याला अधिक कालावधी लागू शकतो.
तुम्हाला हे देखील वाचायला नक्कीच आवडेल:
Reference:
Marathi Online – All Information in Marathi
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा