Silk Farming: जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टी मधून चांगला नफा कमवायचा असेल तेव्हा आपल्याला संबंधित गोष्टी संबंधित चांगले ज्ञान असणे गरजेचे ठरते. मग ते शेती असो किंवा व्यवसाय आपल्याला आपण जे काम करतोय त्याविषयी ज्ञान घेणे गरजेचे ठरते. जसे आपण शेती करत असताना पिकांच्या लागवडीपासून, खतांचे नियोजन, पाणी नियोजन व रोग व्यवस्थापन करत असतो तसेच आपल्याला व्यवसायाच्या बाबतीमध्ये देखील असते.
रेशीम शेती हा एक व्यवसाय आहे व या व्यवसायामध्ये चांगला नफा देखील मिळतो परंतु रेशीम शेती मधून चांगला नफा मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे ठरते व रेशीम शेतीचे चांगले व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते.
रेशीम शेतीमध्ये कार्यरत असलेले फारच कमी शेतकरी हे कमी कालावधीमध्ये लाखोंचा नफा कमवतात. परंतु हा नफा कमवत असताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते व त्यामधूनच रेशीम शेती ही फायदेशीर केली जाते चला तर मग जाणून घेऊया रेशीम शेती करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे व इतर महत्त्वाची माहिती.
रेशीम शेती मधून चांगल्या उत्पादनासाठी व्यवस्थापन
1. जेव्हा आपण रेशीम शेती करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या पुढील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेशीम किड्यांसाठी लागणारा तुतीचा पाला व तुतीच्या पाल्यासाठी आपल्याकडे तुतीच्या झाडांची बाग असणे गरजेचे ठरते. संबंधित पाला हा दर्जेदार असावा लागतो त्यासाठी बागेचे व्यवस्थापन करावे.
2. जेव्हा आपण रेशीम कोश ची काढणी सुरू करतो तेव्हा लगेच आपण तुतीच्या बागेची छाटणी करावी.
3. बागेची छाटणी झाल्यानंतर सऱ्यांमध्ये नांगरून आवश्यक खतांच्या मात्रा द्यावात.
4. रेशीम कोष काढल्यानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करावे व रेशीम कोष ठेवण्याची व्यवस्था करावी.
रेशीम उद्योग असा सुरू करा
जेव्हा आपण रेशीम उद्योग सुरू करतो तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते रेशीम शेतीमध्ये एका खोलीच्या आत मध्ये कीटक पाळले जातात संबंधित खोलीत वारा खेळता असावा व प्रकाश व्यवस्थापनासह केलेली असावी. रेशीम कीटकांना तुतीचा पाला देणे गरजेचे ठरते.
संगोपन करण्याच्या खोलीमध्ये लाकडी ट्रायपॉड ठेवावे व त्याच्या खाली पाणी ठेवावे जेणेकरून कीटक व मुंग्या यांच्यापासून संरक्षण होईल रेशीम उद्योग हा शेतीबरोबर करण्यात येणारा एक जोडधंदा आहे ज्याची आपण कमी खर्चामध्ये सुरुवात करू शकतो व नंतर हा उद्योग आपल्यासाठी चांगला उत्पादनाचा स्त्रोत बनू शकतो.
रेशीम शेती उत्पादन | Silk Farming
रेशीम शेती मधून एक उत्पादन मिळण्यासाठी साधारण अडीच महिन्यांचा कालावधी लागतो व खर्च आणि दर बघितले तर आपण रेशीम शेती मधून चांगला नफा कमवू शकतो. रेशीम चे प्रमाण हे 18 ते 22 टक्के असते व रेशीम कोष उत्पादन हे अडीचशे ते तीनशे किलो पर्यंत मिळू शकते व रेशीम कोष ला पण मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो त्यामुळे या शेतीतून आपण चांगला नफा मिळू शकतो.
अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी व हवामान अंदाज तसेच बाजार भाव मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व इतर कोणत्याही प्रकारच्या शंकांसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा