Weather Update: बंगालचा उपसागर लगतच्या परिसरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. विशाखापटनम भुवनेश्वर आणि विदर्भाच्या एकदम पूर्वी भागांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे.
पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज
कोकणामध्ये सकाळपासूनच पावसाचा राहणार आहे. दुपारी आणि दुपारनंतर नाशिक पट्ट्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये 3 जुलैला पावसाचा जोर वाढणार आहे. अल्कुटी, मंचर, जुन्नर, घारगाव, शिरूर या ठिकाणी पावसाचा जोर वाढेल तर संगमनेर मध्ये देखील तीन तारखेला पावसाची शक्यता आहे.
पुणे हवामान अंदाज
तीन जुलैला पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये पुणे, लावासा, चाकण, पुण्याचा उत्तरी परिसर यामध्ये खोपोली वगैरे त्यामध्ये पावसाची शक्यता आहे. पुण्याचा आजूबाजूचा परिसर जसे की दौंड, बारामती, इंदापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. पुणे विभागातील सातारा सांगली येथे देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
तीन जुलैला उत्तर महाराष्ट्र मध्ये पावसाचा प्रभाव कमी होईल. तीन जुलै रोजी नगर, सोलापूर, सांगली, नाशिक, कोल्हापूरच्या भागांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा मध्ये देखील पावसाचा जोर वाढेल यामध्ये परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव सर्वत्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तीन जुलैला हिंगोलीच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि अमरावती विभाग हवामान अंदाज
नागपूर, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती विभागामध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
04 जुलै हवामान अंदाज
दक्षिण कोकणामध्ये आपल्याला चार जुलै रोजी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस बघायला मिळेल. कोकणालगतचा भाग पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढेल. उत्तर कोकणामध्ये देखील मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये 4 जुलैला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पूर्वी पट्ट्यामध्ये देखील चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. अहमदनगर मध्ये देखील चार जुलैला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या उत्तरे परिसरामध्ये पावसाचा स्तर काहीसा कमी राहील यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये काहीसा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. चार जुलैला मराठवाड्यात सर्वच भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. रात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगर तसेच नगर जिल्ह्यामध्ये मध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा