Havaman Andaj: आजचा हवामान अंदाज, विविध ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा

Havaman Andaj: आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ग्वालियर आणि अहमदाबादच्या परिसरामध्ये चक्रकार स्थिती निर्माण होत आहे जिथे अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे खेचले जात आहेत. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.

कालपासूनच किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे व आज देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणामध्ये चिपळूण दापोली खेड या भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होऊ शकतो रत्नागिरी, राजापूर, साखरपा येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. उत्तर कोकणामध्ये मुंबई, कल्याण, डोंबिवली, खोपोली, वाडा पालघर आणि डहाणू या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे डहाणूच्या आसपासच्या परिसरामध्ये ढग फुटी सदृश्य पाऊस देखील पडू शकतो.

नाशिक आणि नाशिकच्या पश्चिम पट्टा मध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर बघायला मिळेल. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. दुपारनंतर जुन्नर खेड तसेच अहमदनगरचा एकदम पश्चिम परिसर या भागात मध्यम ते जोरदार तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुणे आणि उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज

आज पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे जिल्ह्याच्या पूर्वी परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी राहील तर पश्चिम परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील.

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. एकदम कडेचा उत्तरी परिसर शहादा, तलोडा, खापर या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. जळगाव मधील चोपडा, अडावड, यावल, सावदा, आडगाव, हरीपुरा या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील.

सातारा, सांगली मध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे एकदम कडाच्या कोकणालगतच्या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. सांगलीमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहीन ठिकठिकाणी हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

मराठवाडा आणि विदर्भ हवामान अंदाज

दुपारनंतर मराठवाड्यात खूप ठिकाणी पावसाची शक्यता आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे. धाराशिवच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाचा जोर राहणार आहे. मराठवाड्याच्या उत्तरी परिसरामध्ये इतर भागांच्या तुलनेत जास्त पाऊस राहील.

आज विदर्भात नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोलीमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो भाग बदल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील.

दररोजचे व्हाट्सअप वर हवामान अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा