Maharashtra Weather: मागील 24 तासांमध्ये कोकण आणि घाट माथ्यावर जोरदार पाऊस बघायला मिळाला. घाट माथ्यावर आंबोने येथे सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. मागील 24 तासांमध्ये कोकणासह महाराष्ट्रातील ठिकठिकाणी पावसाची हजेरी बघायला मिळाली. आज महाराष्ट्रात कोणत्या भागात पाऊस होणार आहे कुठे पावसाची हजेरी लागणार आहे याची माहिती जाणून घेऊया.
आज महाराष्ट्र मध्ये पंधरा ते पंचवीस ताशी वेगाने वारे बऱ्याच भागांमध्ये बघायला मिळणार आहे. हे वारे मुख्यतः कोकणाचा पूर्वी परिसर, नाशिक, अहमदनगर, आणि पुणे विभागातील पूर्वी परिसर, नंदुरबार विभागाचा दक्षिणी परिसर या भागांमध्ये बघायला मिळतील. या भागांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
कोकण आणि अमरावती विभाग हवामान अंदाज
कोकणामध्ये आज पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांचा समावेश होतो तरीपण कोकणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
आज अमरावती विभागांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती, अकोला या जिल्ह्यांचा एकदम उत्तरी परिसरामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो या व्यतिरिक्त इतर भागांमध्ये वाकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या भागांमध्ये पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळेल.
उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज
उत्तर महाराष्ट्रामध्ये आज पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये काही काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो. बालवाडी, चोपडाच्या तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आळमनेर, चिमठाणे, दोंडाईचा, साक्री, नवापूर, बोपखेल या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
धुळ्याच्या उत्तरी परिसरामध्ये काही ठिकाणी आज पाऊस होऊ शकतो. जळगावच्या उत्तरी भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बुरनपुर, धरणी, अचलपूर, अकोट या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर तुरळक भागात जोरदार पाऊस होईल.
नागपूर विभाग हवामान अंदाज
नागपूर विभागामध्ये आज पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु नागपूर विभागामधील एकदम उत्तरे परिसरामध्ये घोटी, गोंदिया, वरूड, सौसर या भागांमध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. इतरत्र नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागांत पावसाचा प्रभाव कमी होताना बघायला मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्र हवामान अंदाज
अहमदनगर मध्ये पश्चिम भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील तुरळक भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. लातूर, नांदेड आणि मराठवाड्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये कोकण लगतच्या भागांत मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक विभाग मध्ये आज पावसाचा प्रभाव कमी आहे फक्त पूर्व विभागांमध्ये जास्त पावसाची शक्यता.
दररोजचे हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा