Farm Income Tax: शेतीच्या उत्पादनावर इन्कम टॅक्स लागतो का? इतर कोणत्या उत्पादनांवर इन्कम टॅक्स लागतो

Farm Income Tax: ज्याप्रकारे औद्योगिक किंवा सरकारी उत्पादनांमधून मिळणाऱ्या मिळकतीवर आपल्याला आयकर द्यावा लागतो तसेच इतर काही ठिकाणी आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असतो परंतु शेतीसाठी इन्कम टॅक्स भरावा लागतो की नाही याविषयी माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेऊया.

जर आपण आयकर विभागाच्या आयकर विषयी माहिती जाणून घेतली तर आपल्याला जाणवेल की शेतीच्या उत्पादनाची नेमकी व्याख्या कोणती आहे व कोणत्या प्रकारच्या शेतीच्या उत्पादनावर आपल्याला आयकर भरावा लागू शकतो. शेतीच्या मुद्द्याला अनुसरून आयकर विभागामार्फत काही तरतुदी करण्यात आलेला आहे ज्यांची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये प्राप्त करूया.

Farm Income Tax: शेती उत्पादनाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी

शेतीमधील व्यवसाय हा विक्रीचा व्यवसाय म्हणून ग्राह्य धरला जात नाही म्हणजेच जर आपण आपल्या शेतीतील फार्म हाऊस भाड्याने दिले तर आपल्याला त्यावरती प्रॉपर्टी कर भरावा लागू शकतो व जर आपण आपली जमीन भाडेतत्त्वावरती दिलेली असेल तर त्याचा शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनामध्ये अंतर्भाव केला जातो. जर आपण शेतीची विक्री केली तर संबंधित जमिनीचे गणना शेत जमिनीमध्ये होत असेल तर त्यावरती कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही.

समजा आपल्या शेतीतून आपल्याला उत्पादन मिळत असेल व आपला कोणताही इतर बाह्य व्यवसाय नसेल तर संबंधित उत्पादन हे करमुक्त मानले जाते परंतु जर आपला इतर कोणताही बाहेर व्यवसाय असेल व आपल्या शेतीचे उत्पादन नफा हे ₹5000 पेक्षा जास्त होत असेल त्या वरती आपल्याला टॅक्स भरावा.

आपण आपल्या शेतीच्या पोच पावत्या व्यवस्थित ठेवल्या पाहिजे तसेच वर्षाला कोणते पीक केलेले आहे त्याची नोंद केली पाहिजे. शेतकऱ्यांनी तसेच शेती संबंधातील व्यक्तींनी शेतीची कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे गरजेचे ठरते. जर आपला शेतीबरोबर इतर कोणता व्यवसाय असेल तर आपण शेतीची हिशोब वही इतर व्यवसायांपासून वेगळी ठेवल्यास फायदा होतो.

शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या उत्पादनातून कर आकारण्यात येत नाही अशी एक समजत असते परंतु आयकर विभागातील वेगवेगळ्या तरतुदींद्वारे शेतीच्या उत्पादनावर देखील कर आकारलेला असतो. आता आयकर विभागामार्फत नवीन तंत्रज्ञानामुळे शेतीचे उत्पादन वाढत आहे की नाही याची दखल घेतली जात आहे.

दररोज नवनवीन माहिती व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा.

How to create website in Marathi

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा