Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळ किनारपट्टीला धडकले, मोठे नुकसान

Biparjoy Cyclone: गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळ दाखल झाले आहे. या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व कच्छ आणि सौराष्ट्र च्या किनारी भागांवर जमीन खसळण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे लँड फॉल होत आहे. किनारी भागांना वादळाचा तडाखा बसला असून ठीक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे व ताशी १०० ते १३० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय आपत्ती प्रतिसाद दल, तसेच भारताच्या तिन्ही सेनांना अलर्ट देण्यात आलेला आहे व विविध कर्मचारी बचाव प्रक्रियेत सक्रिय आहेत. किनारपट्टीच्या भागात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी तेथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

चक्रीवादळापासून जीवित हानी काढण्यासाठी किनारी भागातील आठ जिल्ह्यांमधील 94 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे व पुढील काही तासांमध्ये वाऱ्याचा वेग 140 किलोमीटर प्रति तास जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एसडीआरएफच्या च्या 12 तुकड्या व एनडीआरएफ च्या 15 तुकड्यांबरोबर हवाई दल, नौदल,तटरक्षक दल, व इतर सैन्य दलाच्या तुकड्या बचाव कार्यासाठी सज्ज आहेत.

Biparjoy Cyclone: बिपरजॉय चक्रीवादळ किनारपट्टीला धडकले, मोठे नुकसान

द्वारका, गांधीधाम, भुज, जामनगर, नलिया, मांडवी येथे 27 तुकड्या बचाव करण्यासाठी उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. हवाई दलाने वडोदरा, अहमदाबाद येथे एक एक हेलिकॉप्टर सज्ज केले आहे. पोरबंदर, ओखा या भागांमध्ये चांगल्या जलतरणपटूंचा समावेश असलेल्या दहा ते पंधरा टीम सज्ज करण्यात आल्या आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बचाव कार्यासाठी आवश्यक संसाधनांची जमावणी राष्ट्रीय सुरक्षा दलाने केलेली आहे. IMD कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम हा मध्यरात्री बारा वाजेपर्यंत राहील. या चक्रीवादळामुळे दोन ते तीन मीटर उंचीच्या लाटा उसळतील व अत्यंत मुसळधार पाऊस पडेल.

दररोजचे हवामान अपडेट व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा, त्यासाठी येथे क्लिक करा

IMD Mansoon Update Maharashtra

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा