IMD: मान्सून पावसाबद्दल हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

IMD update: यावर्षी भारतामध्ये दरवर्षीच्या तुलनेत सात दिवस उशिरा मान्सूनची हजेरी झाली. दरवर्षी एक जूनला येणारा पाऊस हा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आठ जूनला केरळ मध्ये बघायला मिळाला.

नैऋत्य मोसमी पाऊस हा 18 जून ते 21 जून च्या दरम्यान संपूर्ण पूर्व आणि दक्षिण भारतामध्ये पसरणार आहे. IMD पुणे विभागाचे हवामान प्रमुख के.एस.होशाळीकर यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण भारतात मान्सून पसरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

केरळ मध्ये 8 जून ला मान्सून पोहोचल्यानंतर हळूहळू हा मान्सून तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आणि महाराष्ट्र मध्ये बहुतांश ठिकाणी पोहोचला. महाराष्ट्र राज्यात 11 जून ला मान्सून हजर झाला व पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र मध्ये मान्सून पसरण्यासाठी अनुकूल परिस्थिती बघायला मिळत आहे. संपूर्ण पूर्व आणि दक्षिण भारतामध्ये 18 जून ते 21 जून च्या दरम्यान हा मान्सून पाऊस पोहोचणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत देण्यात आलेली आहे.

IMD: मान्सून पावसाबद्दल हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सूनची हजेरी बघायला मिळाली परंतु बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची आद्रता कमी होत आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे मान्सूनचे वारे हिमालयाला अडल्यामुळे मान्सूनचा जोर कमी झाला आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसत नाही म्हणून महाराष्ट्रात 25 जून नंतर मान्सूनचा जोर बघायला मिळण्याची शक्यता हवामान तज्ञांमार्फत वर्तवण्यात आली आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिणामामुळे मान्सून लांबला

दरवर्षी महाराष्ट्रात सात ते आठ जून जून रोजी मान्सून ची हजेरी बघायला मिळते व त्यानंतर दहा ते बारा जून मध्ये मुंबई व १५ जून नंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पसरतो परंतु यावेळेस बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून ची आद्रता कमी झाली आहे व त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी मान्सून पसरण्याचा वेग कमी झाला आहे.

व्हाट्सअप वर हवामान अपडेट मिळवण्याकरता येथे क्लिक करा व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Weather update: मान्सूनचा वेग मंदावला, बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम

 
Havaman andaj

 

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा