Crop Management: अनियमित पाऊस पडत असल्यामुळे पिकांचे नियोजन कसे करायचे जाणून घ्या

Pik Mahiti: यावर्षी पावसाळ्यामध्ये महाराष्ट्र मध्ये अनेक ठिकाणी अनियमित स्वरूपाचा पाऊस पडताना बघायला मिळत आहे. पावसाळ्याआधी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते व त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने खंड पाडला, जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र चांगल्या पावसाला सुरुवात झाली होती. परंतु त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये परत पावसाने खंड पडला व त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला.

अनियमित स्वरूपात पाऊस येणे व कधी कमी वेळ तर कधी खूपच जास्त वेळ येत असलेल्या पावसामुळे पिकांवरती याचा परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने बहुतेक भागांमध्ये कोरडवाहू शेती आहे म्हणूनच अनियमित पाऊस पडत असल्यामुळे पिकांचे नियोजन कसे करायचे याविषयी या लेखात जाणून घेऊया.

आता ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये पिकांची पेरणी केलेली असेल किंवा ज्या शेतकऱ्यांची पिके आता फुलोऱ्यामध्ये किंवा दाणे भरण्याची स्थितीमध्ये असतील तेव्हा त्यांनी पुढील उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

 

• सोयाबीन पिकामध्ये वीस ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन सोयाबीन वर फवारणी करावी

• कापूस पिकामध्ये १३:००:४५ या विद्राव्य खताला दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कपाशी वरती फवारणी करावी.

• सध्या पावसामध्ये खंड पडत असल्यामुळे व अनियमित पाऊस पडत असल्यामुळे पिकांच्या दोन्ही ओळींमधील भाग काहीसा भुसभुशीत करावा जेणेकरून पाऊस पडल्यावर पाणी जागीच मुरेल

• जर आपल्याकडे शेततळे असेल तर अतिरिक्त असलेले पाणी शेततळ्यामध्ये साचवावे

• सोयाबीन पिकामध्ये शेंगा भरण्याच्या वेळेस व कपाशीचे कापसाची बोंडे तयार होण्याच्या वेळेस संबंधित पिकाला पाण्याची कमतरता राहणार नाही याची काळजी घ्यावी.

• जर आपली शेती पावसावरती अवलंबून असेल तर चांगला पाऊस पडल्याशिवाय खतांचा संपूर्ण डोस देणे टाळा

• जर आपण कमी क्षेत्रावरती शेती केलेले असेल किंवा काही भाजीपाला पिकांची लागवड केलेली असेल तर आपण आच्छादनांचा वापर करून जमिनीमधील ओलावा टिकून ठेवू शकतो आच्छादनांमध्ये आपण गव्हाचा भुसा, मल्चिंग पेपर, काडी गवत यांचा उपयोग करू शकतो.

अनियमित पावसामधील फळ झाडांचे नियोजन – Crop Management

1. फवारणी द्वारे विद्राव्य खतांची फवारणी

फवारणी द्वारे योग्य खतांची फवारणी केल्यामुळे पिकांची अनियमित हवामानामध्ये तग धरून राहण्याची क्षमता वाढते व दुष्काळी परिस्थितीमध्ये पिकांचा ताण कमी होतो

2. आच्छादनांचा उपयोग करणे

विविध नैसर्गिक तसेच नैसर्गिक आच्छादनांचा उपयोग करून आपण फळझाडांच्या मुळांवर सूर्य मुळे होणारा प्रभाव कमी करू शकतो व जमिनीमधील ओलावा टिकून ठेवू शकतो नैसर्गिक साधनांमध्ये आपण गव्हाचा भुसा, काडी गवत तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या काडीकचऱ्याचा उपयोग करू शकतो.

3. पाण्याची फवारणी

फळझाडे तर जेव्हा तानावर असतात तेव्हा त्यांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागू शकतो व त्यामुळे पिकांवरती अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीमध्ये एक दिवस सोडून पाण्याची फवारणी केल्यास पिकांचे तापमान योग्य राहण्यास मदत होते.

अशाच नावीन्यपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करून आम्हाला आत्ताच जॉईन करा

Havaman Andaj Maharashtra
Havaman Andaj Maharashtra

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा