Havaman Andaj: महाराष्ट्र मध्ये हवामानात मोठा बदल होण्याचा हवामान अंदाज देण्यात आलेला आहे ज्यामुळे महाराष्ट्र मध्ये 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याचा इशारा ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केलेले आहे. त्यांनी दिलेल्या हवामान अंदाज मध्ये त्यांनी विविध जिल्ह्यांची नावे प्रकाशित केलेली आहे.
महाराष्ट्र मध्ये हवामान विषयी पंजाबराव यांचे मोठे नाव आहे त्यांनी दिलेले हवामान अंदाज खरे ठरतात असे शेतकऱ्यांचे मत आहे ते निसर्गातील विविध घटकांच्या आधारे हवामान अंदाज व्यक्त करत असतात आणि त्यांचे अवकाळी पावसाविषयीचे हवामान अंदाज बऱ्यापैकी खरे देखील ठरतात त्यामुळे पीक नियोजनासाठी अनेक शेतकरी पंजाबराव यांच्याकडून हवामान अंदाज जाणून घेत असतात. चला तर मग आजच्या या हवामान अंदाज मध्ये पंजाबराव यांनी कोणत्या जिल्ह्यांची नावे सांगितले आहे आणि कुठे जोरदार पाऊस पडणार आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया.
Havaman Andaj: मोठ्या गारपिटीचा इशारा पंजाब डख हवामान अंदाज
सध्या गहू काढणी चालू आहे कांदा काढणे चालू आहे याच दरम्यान पंजाबराव यांनी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे त्यानुसार 11 फेब्रुवारी नंतर पिकांचे रक्षण करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे कारण 11 तारखेनंतर महाराष्ट्र मध्ये गारपिटीचा इशारा दिलेला आहे. दरम्यान त्यांनी 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज दिलेला आहे.
पंजाबराव यांनी सांगितलेला हवामान अंदाजानुसार पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे याचबरोबर मराठवाड्यामध्ये देखील विविध भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. मुख्यतः पूर्व विदर्भामध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
पूर्व विदर्भ मध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये गारपीट देखील होणार आहे आणि यानंतर हा पाऊस पश्चिम विदर्भाकडे सरकणार आहे. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, वाशिम, अमरावती, पुसद हिंगोली मध्ये पाऊस येणार आहे त्याचबरोबर परभणी आणि बुलढाणा मध्ये पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्र बरोबरच बाहेरच्या राज्यांमध्ये देखील पावसाचा इशारा पंजाबराव यांनी दिलेला आहे त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये वातावरणामध्ये बदल होऊन गारपीट होऊ शकते असा हवामान अंदाज दिलेला आहे.
पंजाबराव यांनी सांगितले की दहा तारखेपर्यंत वातावरणामध्ये बदल होणार आहे आणि 11 तारखेपासून पाऊस पडण्यास सुरुवात होईल हा पाऊस महाराष्ट्रात सर्व तर नसला तरी पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पडेल. याचबरोबर वातावरणामध्ये उष्णतेमध्ये वाढ झालेली बघायला मिळेल. उन्हाचा पारा काहीसा वाढेल.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा