IMD update: पुढील 24 तासात 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा

Havaman andaj: महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. बंगालचा उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रातील वातावरणावर परिणाम होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे आज देखील महाराष्ट्रातील पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे

आज महाराष्ट्र मधील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटसह पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ठीक ठिकाणी तुरळक परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

राजस्थान तसेच मध्य प्रदेश मधील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा आस पसरलेला बघायला मिळत आहे ज्यामध्ये उदयपूर रतलाम जैसलमेर तसेच रांचीच्या परिसरामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे. बंगालचा उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भामध्ये ढगांची दाटी होत आहे.

वाढत असलेल्या उन्हाच्या तडक्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे उष्णतेचा तडाखा वाढलेला वाढलेला आहे त्यातच पावसाची एखादी सरी सुखावून टाकत आहे. पावसाच्या पोषक वातावरणामुळे आज विदर्भामध्ये नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे पण बघा: टोमॅटोचे बाजार भाव अचानक कसकाय पडले बघा

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, छत्रपती संभाजी नगर तसेच विदर्भामधील अकोला वाशिम, बुलढाणा, यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र मध्ये अहमदनगर नाशिक आणि जळगाव मध्ये पावसाचा इशारा आहे.

आज कोकणामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. सध्या समुद्र सपाटी पासून 7.6 किलोमीटर उंचीवरून वारे वाहत आहे त्यामुळेच वातावरणाची प्रणाली उद्यापर्यंत झारखंड सरकण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा:

Havaman andaj

Maharashtra drought

WhatsApp ग्रुप जॉईन करा