Tomato Rate: सध्या महाराष्ट्र मध्ये टोमॅटोला खूपच कमी दर मिळत आहे. टोमॅटो मार्केटमध्ये नेऊन विकण्यासाठी वाहतुकीचा खर्च देखील निघत नाहीये. सर्वत्र टोमॅटो भावावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे त्यामुळेच आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत टोमॅटोचे बाजार भाव कस काय पडले?
टोमॅटोचा उत्पादन खर्च प्रति किलो 12 रुपये पर्यंत असतो परंतु टोमॅटो बाजार भाव हे एक रुपयांपासून सुरू होऊन पाच रुपये हा सर्वसाधारण दर टोमॅटो ला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो शेतीमध्ये मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे. काही दिवसांपूर्वी चांगले असलेले टोमॅटो बाजारभाव अचानक कोसळले आहेत.
टोमॅटोला कमी बाजार भाव Tomato Rate
टोमॅटोच्या वाहतुकीसाठी साधारण दोन ते तीन रुपये प्रति किलो असा खर्च येत असतो व सध्याच्या मार्केटनुसार शेतकऱ्यांना फक्त वाहतुकीचा खर्च टोमॅटोमधून निघत आहे व उत्पादन खर्चाचा तोटा सहन करावा लागत आहे. जेव्हा टोमॅटोला बाजार भाव जास्त होते तेव्हा सरकारने नेपाळकडून टोमॅटो आयात करून टोमॅटोचे बाजार भाव पाडल्याचे तसेच टोमॅटो बाजारभाव वाढू न देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
हे पण बघा: राज्यात दुष्काळाची चाहूल, १३ जिल्हे रेड झोन मध्ये! पुढे काय होणार
सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे व त्यामुळे टोमॅटोचा पुढील हंगाम घेता येणार की नाही याबद्दल शंका व्यक्त होत आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी व टोमॅटो बाजारभाव सुधारणा व्हावी अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. टोमॅटोच्या पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडण्याची शक्यता आहे.
दररोज बातमीपत्र व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी शेतकरी ग्रुप जॉईन करा
हे पण बघा: पुढील तीन दिवस 14 जिल्ह्यात पावसाचा इशारा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा