Havaman update: मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी शुक्रवारी पावसाला सुरुवात झाली आहे तसेच विदर्भामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे व राज्यात ठीक ठिकाणी श्रावण सरी बरसत आहेत त्यामुळेच आज कुठे पाऊस पडणार आहे याविषयी माहिती जाणून घेणे गरजेचे ठरते.
महाराष्ट्रात सुट्टीवर गेलेला पाऊस परत चालू झाला आहे व अशातच पुणे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 25 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकरी थोडासा सुखावला आहे. महाराष्ट्र मध्ये 1972 नंतर एवढा मोठा पावसाचा खंड पहिल्यांदाच पडलेला आहे.
Havaman update: आजचा हवामान अंदाज
आज शनिवारपासून कोकण आणि विदर्भामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील सर्व जिल्ह्यांना व जळगावला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
पुणे हवामान खात्याकडून आज पुण्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता आहे. विदर्भामधील सर्व जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र मध्ये जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विविध ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस पडलेला नाही त्यामुळे पिके तानावर आली होती व शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते परंतु आता प्राप्त झालेल्या हवामान अंदाजाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी गडचिरोली आणि नांदेडमध्ये पावसाला सुरुवात झाली बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर हा पाऊस पडत होता. आज देखील नांदेडला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा