ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यांमध्ये पावसाने दडी मारली होती महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये व राज्यांमध्ये देखील पावसाचे प्रमाण कमी झाले होते परंतु आता महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे आगमन होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आता महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सरासरी पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. अशातच मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ज्यामध्ये पुढील एक-दोन दिवसांमध्ये मराठवाड्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Rain Update – आज या ठिकाणी पडणार पाऊस
मुंबईमध्ये देखील गुरुवारपासून परत एकदा पाऊस पडण्याची सुरुवात झालेली आहे. भारतीय हवामान विभागाने आधीच ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील असा अंदाज वर्तवलेला होता व त्याचा परिणाम आपल्याला पहिल्याच आठवड्यापासून बघायला मिळाला. ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने दडी मारली व त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा पावसाच्या आगमन कधी होणार याची वाट पाहत आहे.
लवकरच जर हवामान अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांची चिंता मिळणार आहे व राज्यात पाऊस कमबॅक करणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात काही भागांमध्ये चांगल्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यामध्ये लवकरच पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.
भारतीय हवामान खात्याने सांगितलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार महाराष्ट्र मध्ये 18 ते 24 ऑगस्ट च्या दरम्यान पुन्हा एकदा चांगला पाऊस पडू शकतो तसेच मराठवाड्यामध्ये देखील विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दररोज चा हवामान अंदाज whatsapp मध्ये मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा