IMD update: महाराष्ट्रराज्य सह संपूर्ण देशभरामध्ये मागील काही दिवसांपासून पाऊस कमी झाल्याचे चित्र आहे भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल हे आधीच हवामान अंदाजात सांगितलेले होते व त्यानुसार ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यापासूनच महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे परत पावसाचे कधी आगमन होईल याकडे सर्व शेतकरी व महाराष्ट्रतील जनता लक्ष ठेवून आहे.
यावर्षी जून महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली होती व जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडायला लागला होता त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता आता भारतीय हवामान विभागामार्फत 18 ऑगस्ट नंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे.
IMD update: महाराष्ट्रात या ठिकाणी होईल मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात लवकरच पाऊस परतणार आहे असा दिलासा हवामान विभागाच्या अंदाजातून व्यक्त होत आहे. या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगला मुसळधार पाऊस पडू शकतो. महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ दिलासा देण्याचे कार्य केले तर आता हवामान खात्याने लवकरच राज्यात पाऊस कोसळेल असे सांगितलेले आहे.
नवी मुंबई, पालघर, रायगड या ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहील तर कोकण आणि विदर्भामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बहुतांश ठिकाणी पडण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते.
15 ऑगस्ट पासून महाराष्ट्र मध्ये पावसासाठी चांगली परिस्थिती निर्माण होत आहे पुढेही हे वातावरण असेच राहील असे हवामान खात्याच्या मार्फत सांगण्यात आले आहे 20 ऑगस्ट पर्यंत बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचे चित्र आहे.
पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र मध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहील तर विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळेल. भारतीय हवामान अंदाजाने खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट मध्ये जोरदार पाऊस पडू शकतो तर विदर्भामध्ये देखील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे
दररोजचा हवामान अंदाज व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी येथे क्लिक करून लगेच आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा