IMD Update: पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

IMD update: महाराष्ट्र मध्ये वातावरणामध्ये झपाट्याने बदल होत आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे पिकांवरती ताण आलेला आहे.

महाराष्ट्र मध्ये हवामान बदलाचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांची दिशा बदलते व त्यामुळे महाराष्ट्र मध्ये वातावरणात बदल होतो. जर बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा कमी प्रभाव असेल तर महाराष्ट्र मध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होते.

IMD update: पुढील दोन दिवसांमध्ये या भागात अतिवृष्टीचा इशारा

आता अशा परिस्थितीमध्ये भारतीय हवामान विभागाकडून एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाचा संपूर्ण हवामान अंदाज या लेखात जाणून घेऊया.

हवामान विभाग पुणे च्या के एस होसळेकर यांनी उद्या विदर्भामध्ये चांगल्या जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे तर येत्या दोन दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे. त्यांनी ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. मागील दोन आठवड्यांपासून ऑगस्टमध्ये सुरू असलेल्या पावसाचा तुटवडा यामुळे भरून निघण्याची शक्यता आहे.

आता बंगालच्या उपसागर मधील निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला फायदा होणार असल्याचे हवामान विभागामार्फत समजले आहे. संबंधित भागांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बरेच दिवसांनी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाने हजेरी लावली. येत्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

दररोज हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा

Havaman update Maharashtra

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा