Havaman andaj: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्र तसेच देशभरामध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचे बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागामार्फत ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता आणि त्याच अंदाजानुसार पहिल्याच आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर अल्पत्य झाल्याचे बघायला मिळाले.
जून महिन्यामध्ये पावसाला थोडी उशिरा सुरुवात झाली होती परंतु जुलै महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढले होते त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. आता भारतीय हवामान विभागाने 18 ऑगस्ट नंतर महाराष्ट्र राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
Havaman andaj: हवामान विभागाचा ट्विटर द्वारे शेतकऱ्यांना संदेश
भारतीय हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात 18 ऑगस्ट पासून पावसाची शक्यता आहे. तसेच 18 ते 24 ऑगस्ट आणि 25 ते 21 ऑगस्ट या दरम्यान देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुख्यतः विदर्भातील काही भागात संबंधित कालावधीत पावसाची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणपट्ट्यांमध्ये पाऊस पडू शकतो. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीचा पाऊस पडेल असे अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भात अतिवृष्टी सदृश्य पाऊस आला होता अनेक गावे पाण्याखाली गेली होती.
मात्र आता सात दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे याचा फटका सोयाबीन पिकाला तसेच अन्य पिकांना बसण्याची शक्यता आहे सध्या फुलोऱ्यात आलेलं सोयाबीन पीक पावसापासून वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे व त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
दररोज चा हवामान अंदाज whatsapp च्या माध्यमातून मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा ..
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा