Weather update: मान्सूनचा वेग मंदावला, बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम

तळ कोकणामध्ये मान्सून आल्याची माहिती हवामान खात्यामार्फत देण्यात आलेले आहे तरी एकंदरीत महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावताना बघायला मिळत आहे कारण बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनच्या वाऱ्याचा वेग कमी झालेला आहे. 17 जून पर्यंत कोकणपट्टीमध्ये पाऊस येण्याची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे.

Weather update: मान्सूनचा वेग मंदावला, बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम

समुद्रातील वाऱ्याचा जोर कालच्या तुलनेत आज कमी झालेला बघायला मिळत आहे त्यामुळे खवळलेला समुद्र काहीसा शांत होताना बघायला मिळत आहे संदर्भात हवामान विभागामार्फत महत्वाचे अपडेट जारी करण्यात आलेले आहे. गुरुवारी गुजरातच्या कच्छमध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

गुजरातच्या समुद्रकिनारी उंच उंच लाटा बिपरजॉय या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दिसून येत आहेत. गुजरातच्या किनारपट्टी लगतच्या 7500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले असून चक्रीवादळाविरोधात लढण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहे. भारताचे तिन्ही सैन्य दल अलर्ट मोडवर आहेत व पश्चिम रेल्वे कडून गुजरातच्या किनारपट्टीकडे जाणाऱ्या 67 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना देखील इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात पावसाची हजेरी बघायला मिळू शकते. ठीक ठिकाणी मेघगर्जनेसह हा पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रात रत्नागिरी, नाशिक, पालघर, छत्रपती संभाजी नगर, रायगड, सोलापूर, सांगली, तसेच शहर इतर भागांमध्ये पाऊस होऊ शकतो तर 15 जून नंतर नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

IMD Mansoon Update Maharashtra

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा