Weather Update: पुढील 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याच्या मार्फत देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील मान्सून बद्दल हा एक महत्त्वाचा हवामान अंदाज आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील मान्सूनवर मोठा परिणाम झाला व त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनची गती कमी झाली. भारतामध्ये सामान्यता एक जूनला केरळमध्ये पावसाची हजेरी होते परंतु यावर्षी केरळमध्ये पाऊस येण्यास जवळपास एक आठवडा उशीर झाला, त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनचे गणित हुकले
भारतामध्ये केरळमध्ये आठ जूनला मान्सूनची हजेरी झाली व त्यानंतर काही दिवसातच महाराष्ट्रातील तळ कोकणात मान्सूनची हजेरी झाली परंतु अद्याप महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला नाही. तळ कोकणात मान्सून आल्यानंतर काही दिवसांत चक्रीवादळ निर्माण झाले त्यामुळे मान्सून च्या पुढील वाटचालीला अडथळा निर्माण झाला.
गुजरातच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे 11 ते 18 जूनच्या दरम्यान महाराष्ट्र आणि गोवा मध्ये मान्सूनची वाटचाल एकदम संथ झाली. परंतु आता या चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून पसरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे व पुढील 72 तासांमध्ये महाराष्ट्रातील दक्षिण मध्यभाग, मुंबई, पुणे, मराठवाडा, कोकण आणि इतर प्रदेश मान्सून ने व्यापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात 23 जून नंतर मान्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत व्यक्त करण्यात आलेले आहे. दरम्यान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला होता, परंतु हा पाऊस मान्सूनचा नसून चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम होता असे हवामान विभागाने नमूद केले आहे. लांबलेल्या मान्सूनमुळे महाराष्ट्राचे शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट बघत आहेत.
दररोजचे हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा व व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा