IMD Update: महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, आली आहे उष्णतेची लाट

IMD Update: महाराष्ट्र राज्यात पावसाळा सुरू झाला तरी अजून 31 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पाऊस आलेला नाही. विविध ठिकाणी शेतकरी पावसाची वाट पाहत आहे अशातच हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढलेली आहे. हवामान विभागाकडून विविध ठिकाणी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने विदर्भामध्ये पुढील दोन दिवस जास्त उष्णता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ

महाराष्ट्र राज्यामध्ये पाच ते सात अंशाने तापमान वाट बघायला मिळत आहे. विदर्भामधील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, वाशिम, अकोला, अमरावती या भागांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. ही लाट पुढील दोन दिवस असेल म्हणून या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मान्सूनपूर्व पाऊस होऊन हवेमध्ये गारवा निर्माण होत असतो परंतु यावर्षी देशामध्ये पाऊस उशिरा आला व त्यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सून येण्यास विलंब झाला. अशातच चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे मान्सूनची आद्रता कमी झाली व त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटीचे संकट ओढवले. पुढील दोन दिवस महाराष्ट्रात आणि मुख्यता विदर्भात उष्णतेत वाढ होणार आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सून वर परिणाम

बिपरजॉय चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सून येण्यास विलंब झाला आहे. पाऊस लांबण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात मान्सून येण्याच्या वेळेस निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 23 जून नंतर पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे परंतु तोपर्यंत महाराष्ट्रातील शेतीची सर्व कामे खोळंबली आहेत. जोपर्यंत महाराष्ट्रात 50 ते 60 टक्के पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नका असा सल्ला हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिलेला आहे.

व्हाट्सअप ग्रुप वर दररोजचे बाजारभाव आणि हवामान अंदाज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

 
Havaman andaj

 

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा