Punjab dakh: पंजाब डख यांनी जोरदार पावसाची तारीख सांगितलीय, पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज

Havaman andaj: महाराष्ट्र मध्ये पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील आपला हवामान अंदाज दिलेला आहे यामध्ये त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा अंदाज सांगितलेला आहे.

सध्या ठीक ठिकाणी पाऊस पडत असून नदी नाले दुथडी भरून वाहताना बघायला मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची काहीशी चिंता कमी झालेली आहे परंतु हा पाऊस किती दिवस टिकणार हा प्रश्न देखील शेतकऱ्यांपुढे पडला आहे व त्याच संदर्भात पंजाब डख यांनी हवामान अंदाज सांगितला आहे.

पंजाब डख यांनी हवामान अंदाज सांगताना शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सांगितली त्यामध्ये त्यांनी सांगितले की 14 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल परंतु 16 सप्टेंबर नंतरच महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल व जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. शेतकऱ्यांना हवामान अंदाज सांगताना पंजाबराव यांनी सांगितले की काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे व 13 सप्टेंबर नंतर पावसाला सुरुवात होईल.

पंजाबराव यांनी सांगितलेला हवामान अंदाजानुसार महाराष्ट्र मध्ये 13 तारखेला विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल व त्यानंतर 14 तारखेला पश्चिम विदर्भामध्ये पाऊस पडेल. 15 तारखेनंतर उत्तर महाराष्ट्राकडे पावसाची वाटचाल सुरू होईल. पंजाब डख यांच्यानुसार महाराष्ट्रात 16 ते 20 तारखेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र मध्ये राज्यव्यापी पाऊस पडेल.

मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटेल Havaman Andaj

सध्या जायकवाडी धरणा मधून 2000 कुसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याला फायदा होण्याची शक्यता आहे तसेच आता पावसाने ऊसंत घेतलेली असली तरी पुढील काही दिवसांमध्ये परत नाशिक मध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेले आहे.

दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी उजव्या साईडला असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मधून आम्हाला जॉईन करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा