Havaman update: आज महाराष्ट्र मध्ये विविध जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या हवामान अंदाज मध्ये आपण आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे याची माहिती जाणून घेऊया.
ज्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र मध्ये पाऊस पडत होता तो कमी दाबाचा पट्टा ईशान्य दिशेकडे सरकलेला असल्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना याचा परिणाम होण्याची शक्यता आहे व त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील.
आजचा हवामान अंदाज Havaman update
अहमदनगर मध्ये दुपारपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दुपारपर्यंत नाशिक विभागातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. नाशिक विभागाच्या उत्तरी भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज मराठवाड्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पावसाचे वातावरण कमी होणार आहे. श्री छत्रपती संभाजी नगर, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, बीड, सर्वच भागांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे. काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता नाही च्या बरोबर.
पुणे विभागांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर यांच्या पश्चिम भागाकडे म्हणजेच कोकणालगतच्या भागाकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे विभागाच्या इतर भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण विभागांमध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता कायम आहे तसेच घाटमाथाच्या परिसरावर म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरामध्ये काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
अमरावती विभागामध्ये अमरावतीच्या परिसरामध्ये आज पावसाचा जोर वाढणार आहे तसेच अकोल्याच्या काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यवतमाळच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो तर इतर काही परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. बुलढाण्याच्या काही परिसरामध्ये आज हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
नागपूर विभागामध्ये आज काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हिंगणघाट, वर्धाचा आसपास परिसर, पुलगाव, भद्रावती या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण राहील.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप च्या माध्यमातून मिळवण्यासाठी उजव्या साईडला असलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा वरून आम्हाला जॉईन करा.
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा