Rain update: सात दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसाला सुरुवात, हवामान विभागाने दिलाय ट्विटर द्वारे हवामान अंदाज

Rain update: महाराष्ट्र राज्य मध्ये दोन आठवड्या पूर्वी चांगला पाऊस होत होता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, यवतमाळ, धुळे, कोल्हापूर या भागांमध्ये जोरदार पाऊस होऊन काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. आत्ता हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार लवकरच महाराष्ट्र मध्ये पुन्हा पाऊस आला सुरुवात होण्याची शक्यता आहे

Rain update Maharashtra: पुढच्या सात दिवसांमध्ये पाऊस पडणार की नाही हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत चांगला पाऊस पडू शकतो. त्याचप्रमाणे 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान विदर्भ कोकण तसेच इतर राज्य छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश या भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.

येत्या सात दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परंतु मराठवाड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. पुढील सात दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने केलेली आहे परंतु हा पाऊस तुरळक ठिकाणी व कमी प्रमाणात पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची चिंता सतावत आहे.

दोन आठवड्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडत होता काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती परंतु आता महाराष्ट्रातील ठिकठिकाणी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रोजचा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा