Punjab Dakh: हवामान विभागाकडून ऑगस्ट महिना मध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मागील सात आठ दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर फार कमी झालेला आहे. अशातच पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे.
Punjab Dakh: पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
पंजाबराव डख यांनी दिलेला माहितीनुसार, महाराष्ट्रात 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत पावसाची तीव्रता कमी राहणार आहे परंतु यानंतर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्यात 14 ऑगस्ट नंतर ठीक ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे तसेच 18 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
पंजाबराव डख यांचा सोयाबीन पिक सल्ला
पंजाब डख यांनी सोयाबीन पिकाबद्दल देखील शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पंजाबराव यांनी सांगितले कि ते आधी 14 इंच लांबीवर सोयाबीन ची लागवड करीत होते परंतु त्यामुळे सोयाबीन दाट होण्यास सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी 18 इंच लांबीवर सोयाबीनची लागवड केली व असे केल्यामुळे त्यांना त्यांच्या उत्पन्नामध्ये वाट बघायला मिळाली तसेच यावर्षी त्यांनी 24 इंच म्हणजेच दोन फूट लांबीवर सोयाबीन ची पेरणी केली आहे.
सोयाबीन लागवड करत असताना कृषी विद्यापीठांनी मानकृत केलेल्या बियाणांचा उपयोग करावा असा सल्ला त्यांनी दिला. पंजाबराव डख वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 612 आणि 71 या सोयाबीनच्या जाती चांगल्या पोषक असल्याची माहिती दिली. तसेच राहुरी विद्यापीठाने निर्माण केलेली दुर्वा व डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठाने निर्माण केलेली आंबा जात देखील चांगली असल्याचे म्हटले. चांगल्या काळ्याभोर जमिनीमध्ये राहुरी विद्यापीठाची फुले किमया ही जात वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला.
पंजाब डख यांनी मागच्या वर्षी सोयाबीन लागवड करताना दहा किलो गंधक प्रति एकर या प्रमाणात वापरले होते. सोयाबीन पीक वीस दिवसांचे झाल्यानंतर सुपर फॉस्फेट व 40 दिवसांचे झाल्यानंतर 12:32:16 या खतांचा उपयोग केला. तसेच चांगल्या उत्पादनासाठी वेळीच तन निर्मूलन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
दररोज चा हवामान अंदाज व शेती विषयक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा