Onion Rate: सध्या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या निर्यात शुल्कामुळे कांद्याचे बाजार भाव दबावत असताना बघायला मिळत आहे कांदा निर्यात शुल्क लागू करण्याआधी जे बाजारभाव होते त्यापर्यंत अद्याप कांद्याचे बाजार भाव पोहोचलेले नाहीत त्यामुळे भविष्यामध्ये कांद्याचे बाजार भाव वाढतील की नाही याबद्दल शेतकऱ्यांमध्ये शंका आहे परंतु भविष्यामध्ये कांद्याची आवक कमी होऊन कांद्याचे बाजार भाव वाढण्याची खात्री दिली जात आहे.
सध्या महाराष्ट्र मध्ये कांद्याला दीड हजार ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळत आहे परंतु मागील काही दिवसांमधून मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झालेली आहे परंतु त्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजार भाव वाढताना बघायला मिळत नाही. ज्या प्रमाणात कांद्याची आवक कमी झालेली आहे त्यावरून कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात वाढायला हवे होते, परंतु सरकारच्या निर्यात शुल्क कांदा बाजार भाव सध्या दबावात आहेत.
Onion rate – केव्हा वाढतील कांद्याचे भाव
निर्यात करण्यायोग्य कांद्याचा बाजारभाव वाढत असताना सरकारकडून 19 ऑगस्ट रोजी कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले त्यामुळे २५०० ते २७०० रुपये असलेला कांद्याचा भाव कमी होऊन २००० रुपयांपर्यंत आला परंतु मागील महिन्यापासून मार्केटमध्ये कांद्याचे आवक कमी होत आहे त्यामुळे कांद्याचा दर वाढणे अपेक्षित होते.
हे पण बघा: टोमॅटोचे बाजार भाव अचानक कसकाय पडले बघा
सध्या शेतकऱ्यांच्या चाळींमध्ये असलेल्या कांद्याचे प्रमाण कमी आहे व खरीप मधील कांद्याचे लागवड 30 ते 40 टक्क्यांनी कमी झालेली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा फटका कांदा क्षेत्रावर झालेला आहे व त्यामुळे कांदा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे म्हणून पुढील काही दिवसांमध्ये अजून कांद्याचे आवक कमी होण्याची शक्यता आहे.
पुढे महाराष्ट्र मध्ये मागणीपेक्षा कांद्याचा पुरवठा कमी झाल्यामुळे कांद्याचे बाजार भाव वाढताना बघायला मिळू शकतात परंतु लवकरच येऊन ठेपलेले इलेक्शन मुळे महाराष्ट्रातील राज्यकर्ते महाराष्ट्र कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात करावेत याविषयी प्रयत्न करताना बघायला मिळू शकतात.
हे बघा : पुढील तीन दिवस 14 जिल्ह्यात पावसाचा इशारा
दररोज नाविन्यपूर्ण माहिती व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी शेतकरी ग्रुप जॉईन करा
1 thought on “Onion Rate: भविष्यात कांद्याचे बाजार भाव कधी वाढतील?”