Havaman Live: आजचा हवामान अंदाज, महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

Havaman Live: आज महाराष्ट्र राज्य मध्ये कोकण तसेच घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे मागील दोन दिवसांपासून कमी झालेला पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

ओडिसा तसेच पश्चिम बंगाल च्या सागर तटावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे व समुद्रसपाटीपासून 9.5 किलोमीटर उंचीवरून हवेचे चक्रकार वारे वाहत आहेत. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मान्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे टोक हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेले आहे व मान्सूनचा आस बिहारच्या दरभंगा पासून देवघर, कैनिंग तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे.

Havaman Live | आज महाराष्ट्रात या ठिकाणी पावसाची शक्यता

विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेश मध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर पावसाची उघडीप होताना बघायला मिळत आहे. अधून मधून पावसाच्या सरी कोसळताना बघायला मिळत आहे अशातच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सातारा, पुणे, कोकण, कोल्हापूर या ठिकाणी घाटमाथ्यावर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

विजांसह पावसाचा इशारा 

अमरावती, धुळे, जळगाव, परभणी, वर्धा, नंदुरबार, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, नांदेड ,भंडारा, नागपूर, चंद्रपूर

जोरदार पावसाचा येलो अलर्ट

पुणे, सातारा, रत्नागिरी, ठाणे, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग

दररोज चा हवामान अंदाज मोफत व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला आत्ताच जॉईन करा

IMD update

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा