Rain Forecast: आजचा हवामान अंदाज, महाराष्ट्रात पूर्व विदर्भासह ठिकठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

Rain Forecast: बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र कार्यान्वित होत आहे व या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात ठीक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. आज महाराष्ट्रात पूर्व विदर्भ, कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

पुणे, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा परिसर, रत्नागिरी, रायगड या परिसरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच विदर्भ, मराठवाडा, खानदेश या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

Rain Forecast | आजचा हवामान अंदाज

बंगालच्या उपसागरामध्ये प्रमि दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून वादळी प्रणालीची निर्मिती ही बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही प्रणाली मंगळवारी बांगलादेशच्या किनारपट्टीवर संध्याकाळी धडकली.

आज महाराष्ट्रामध्ये ठीक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

आज महाराष्ट्रात गोंदिया, मुंबई, ठाणे, पालघर, गडचिरोली, नांदेड, भंडारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

परभणी, हिंगोली, बुलढाणा, धुळे, नाशिक, अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, जालना, जळगाव, परभणी, लातूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

दररोज चा हवामान प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला आताच जॉईन करा

Havaman Live maharashtra

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा