IMD Update: देशामध्ये काही भागांमध्ये उष्णतेची लाट आलेली असताना देशातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होताना बघायला मिळत आहे हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार उत्तर भारतामध्ये उष्णतेची उन्हाचा तडाखा बघायला मिळत आहे देशामधील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत.
दिल्ली सह विविध राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे तर आसाम मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली सह बाकी काही राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आज किमान तापमान 26° c तर कमाल तापमान 37° c असणार आहे. आज दिल्लीमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दिल्लीमध्ये 22 जून पासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये पाऊस पडत असतानाच उत्तर प्रदेश मध्ये उष्णता वाढत आहे.
देशात कुठे पडेल पाऊस
देशामध्ये विविध राज्यांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये मध्य प्रदेश, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो तर अंदमान निकोबार, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, पश्चिम हिमालय, आंध्र प्रदेश या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. देशामध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, कोस्टल आंध्र प्रदेश या भागांमध्ये तापमान कमी होत असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेले आहे. बिहारमधील वाढत्या उष्णतेमुळे तेथे उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र मध्ये अजून चांगला पाऊस नाही
महाराष्ट्र मधील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत व सध्या मृग नक्षत्र चालू आहे परंतु या नक्षत्रात देखील महाराष्ट्रात पाऊस पडताना दिसत नाही त्यामुळे शेतीचे सर्व कामे खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जर पावसाची अशी स्थिती राहिली तर खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. कृषी विभागामार्फत खत आणि बियाणे यांचे नियोजन करण्यात आले आहे परंतु पावसाअभावी हे सर्व तसेच पडून आहेत. जोपर्यंत महाराष्ट्र राज्यात चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका असा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे.
दीडशे लाख हेक्टर क्षेत्रावर महाराष्ट्र मध्ये पेरणी केली जाते परंतु यावर्षी पावसाअभावी फक्त एक लाख हेक्टर वर पेरणी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. जर पाऊस अजून लांबला तर महाराष्ट्रातील कडधान्यांच्या पिकांवर मोठा परिणाम होईल व यांचे पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मध्ये तळ कोकणापासून मान्सूनची सुरुवात होते व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पसरतो परंतु अद्याप तळ कोकणामध्ये चांगला सक्रिय मान्सून पाऊस निर्माण झालेला नाही त्यामुळे हवामान विभागानुसार महाराष्ट्रात 23 जून नंतरच चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
व्हाट्सअप ग्रुप वर दररोजचे हवामान अंदाज मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा