IMD Update: महाराष्ट्र राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कमी राहणार ; हवामान विभागाचा अंदाज

IMD Update : महाराष्ट्र राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर आता महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार असल्याची लक्षणे दिसत आहेत व यासंबंधीतच भारतीय हवामान विभागामार्फत एक महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेली आहे ज्यानुसार महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर ओसरेल व त्यानंतर 2 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस होण्यास सुरुवात होईल असे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी माहिती दिली.

पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, घोडबंदर, सातारा आणि पुण्याचे घाटक्षेत्र या ठिकाणी मध्यम पावसाची शक्‍यता आहे तसेच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IMD Update | महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार

महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस तर चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे जालना सांगली सातारा या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत 17 टक्के जास्त पाऊस झालेला आहे.

महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला असला तरी काही ठिकाणी अद्यापही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा दिसत आहे. यावर्षी अद्यापही ठिकठिकाणी जोरदार पाऊस झालेला नाही परंतु महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला आहे.

दररोज चा मोफत हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्याकरिता येथे क्लिक करा व आम्हाला जॉईन करा

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा