Havaman andaj: आज महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट, या काही भागांमध्ये होणार आहे एकदम तुफानी पाऊस

Havaman andaj: गुजरात पासून तिकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा कमी दाबाचा पट्टा विदर्भाच्या उत्तरी परिसरावर देखील आहे आणि विदर्भाच्या पूर्वी परिसरामध्ये देखील दिसत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. काही भागांमध्ये आज दुपारनंतर पावसात जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट देण्यात आली आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.

Havaman andaj: कोकण विभाग हवामान अपडेट

आज सकाळपासूनच काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम आहे. आजही कोकण विभागातील काही भागांना रेड अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट आहे. एकदम किनारपट्टी लगतचा जो काही भाग आहे डहाणू, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वच भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार तर काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे यामध्ये इगतपुरी आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे. ठीक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये, खेडच्या पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळेल. त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली कोल्हापूरचा जो काही कोकणालगतचा भाग आहे यामध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर कमी असला तरी संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. नवापूर, अहवा या भागांमध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे आणि धुळे च्या आसपासच्या परिसरामध्ये आज आपल्याला दुपारी आणि दुपारनंतर पाऊस बघायला मिळेल यामध्ये धुळे, चिमठाणे, अमळनेर, साक्री चा पूर्वी परिसर या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील.

नंदुरबार मध्ये आज मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या पूर्वी परिसरामध्ये आजही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिकचा पूर्वी परिसर आणि अहमदनगर चा काही परिसर यांचा समावेश होतो.

मराठवाडा आणि विदर्भ हवामान अंदाज

मराठवाड्यातील पूर्वी भागातील जिल्हे हिंगोली, नांदेड आणि परभणी या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तसेच लातूरच्या काही भागांमध्ये मध्यम पावसाची शक्‍यता आहे . बीडच्या पश्चिम आणि दक्षिण भागांमध्ये आजही पावसाचा जोर कमी राहणार आहे तर माजलगाव आणि आजपासच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

अमरावती भागातील वाशिम मध्ये खूप जोरदार पाऊस शक्यता निर्माण होताना बघायला मिळत आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव, मोटोला, चिखली, मेहकर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती, वाशिम, यवतमाळ तसेच हिंगोलीच्या पूर्व परिसरामध्ये पावसाचा प्रभाव जास्त राहील.

नागपूर विभागामध्ये देखील आज पावसाचा प्रभाव बदलताना बघायला मिळत आहे. दक्षिण भागातील जिल्हे चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धाच्या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नागपूर विभागामध्ये इतर ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे.

दररोजचा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा व आम्हाला जॉईन करा

IMD Update

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा