IMD Update: महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे विशेष करून घाटमाथा आणि कोकण विभागांमध्ये पुढील पाच दिवस मान्सूनचा पाऊस चांगला सक्रिय असेल अशी माहिती भारतीय हवामान विभाग यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. यावर्षी पाऊस सरासरीच्या तुलनेत उशिरा सुरू झाला परंतु आता पावसाने चांगला जोर पकडला आहे.
IMD Update: पुढील ४८ तास अत्यंत महत्वाचे
पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये ठिकठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल असे आयएमडी ने म्हटले आहे मुंबईमध्ये शुक्रवारी 19 जुलै रोजी सकाळी साडेआठ पासून शनिवार दिनांक 20 जुलै या कालावधीमध्ये २००३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली हा पाऊस जवळ जवळ अतिवृष्टी निकषात मोडतो.
दक्षिण कोकणात दमदार पावसात सुरुवात उत्तर कोकणात काहीसा जोर कमी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कोकणात मध्ये जोरदार पावसाची शक्यता कायम असल्यामुळे ऑरेंज अलर्ट कायम आहे तर उत्तर कोकणामध्ये मात्र पुढील काही कालावधीमध्ये पावसाचा जोर कमी होईल. दरम्यान ठाण्यात आणि पालघर मध्ये ढगफुटी सुदृश्य पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यामध्ये देखील मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे त्यामुळेच मराठवाड्यामध्ये पुढील 48 तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. घाटमाथा परिसरातील पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये देखील मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत जोरदार पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे. बुधवारपर्यंत सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.
विदर्भ मध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात पावसामुळे ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जोरदार पाऊस झाल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.
दररोजचा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आम्हाला जॉईन करा