कामाची बातमी! जिरायती २० गुंठे आणि बागायती १० गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीचे निर्बंध उठले

Land sell maharashtra: बागायती आणि जिरायती जमिनीच्या खरेदी आणि विक्री वरती असलेले निर्बंध आज उठवण्यात आलेले आहे. त्यामुळे अहमदनगर सह महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांमध्ये आता दहा गुंठे बागायती आणि वीस गुंठे जिरायती जमिनीची खरेदी विक्री करणे सोपे झाले आहे व आता थेट खरेदी विक्री करता येऊ शकते.

आता प्राप्त झालेल्या नवीन आदेशानुसार तेवढ्या क्षेत्रासाठी खरेदी विक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या स्वतंत्र परवानगीची गरज असणार नाही व त्यासाठी प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्याची गरज संपली आहे.

महाराष्ट्र राज्यातील रायगड आणि अकोला हे दोन जिल्हे सोडले तर बुलढाणा, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, सिंधुदुर्ग, वाशीम, यवतमाळ, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, नगर, धुळे, पुणे, जळगाव, नंदुरबार, सातारा, परभणी, नांदेड, सांगली, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नागपूर, लातूर, जालना, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आणि शेतीव्यतिरिक्त कार्य करणाऱ्या व्यक्तींना वीस गुंठे जिरायती आणि दहा गुंठे बागायती जमिनीची थेट खरेदी विक्री करता येणे शक्य झाले आहे.

परंतु या नवीन नियमांमध्ये नगरपालिका शेत्र महानगरपालिका व नगरपरिषदा यांचे क्षेत्र वगळलेले आहे.

महाराष्ट्र मध्ये जमिनीचे तुकडे पाडण्यापासून प्रतिबंध असलेल्या अधिनियम 1947 मध्ये बदल करून आता त्यामध्ये काहीशी सुधारणा करण्यात आलेली आहे. दहा गुंठे बागायती व वीस गुंठे जमिनीची खरेदी आणि विक्री करणे यामुळे शक्य होणार आहे व त्यासंदर्भात कारवाई सुरू झालेली आहे.

पीक विम्याची फाईल रखडली, इतक्या कोटींची गरज

गावामध्ये अनेक व्यक्तींना घर बांधण्यासाठी जमिनीची समस्यांचा सामना करावा लागतो तसेच अनेक शेतकऱ्यांना विहिरीसाठी जमीन विकत घेऊन तिथे विहीर बांधायचे असते परंतु आधी असलेल्या नियमामुळे त्यांना हे सर्व करता येत नव्हते परंतु आता प्राप्त झालेल्या नवीन नियमानुसार शेतकरी तसेच खाजगी व्यक्ती कमी क्षेत्रावरील जमिनीची खरेदी विक्री करू शकतात.

हे पण बघा:

One Rupee Pik Vima: फक्त एक रुपया मध्ये विमा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

गॅस सिलेंडर चे आजचे भाव | LPG gas price in Maharashtra

Homemade business : घरबसल्या लाखोंचा नफा देणारा मसाला व्यवसाय कसा सुरु करायचा

आंब्यामधील फळ पोखरणाऱ्या अळीची लक्षणे व उपाय योजना

 

शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp ग्रुप जॉईन करा