आंब्यामध्ये फळ पिकावर सर्वाधिक प्रभाव करणाऱ्या अळीमध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा समावेश होतो जर आंब्यावरती या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला तर मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होते व आर्थिक नुकसानीला सामोरे जायला लागू शकते म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण आंब्यामधील फळ पोखरणाऱ्या अळीची लक्षणे व उपाय योजना जाणून घेऊया.
शास्त्रीय नाव: आंब्यामधील फळ पोखरणाऱ्या अळीचे शास्त्रीय नाव citripestis eutraphera आहे.
Mango fruit borer: आंब्यामधील फळ पोखरणाऱ्या अळीची लक्षणे
जर आंब्यामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला तर आंब्याच्या फळांमध्ये पुढील प्रकारचे लक्षणे आढळून येतात
1. फळे दुभंगून अकाली पडू लागतात
2. जेव्हा आंबा फळ लहान असते तेव्हा त्यामध्ये अळी शिरल्याची लक्षणे दिसतात व काळी छिद्र दिसून येतात
3. आंब्यावरील छिद्रांमधून रस बाहेर पडतो व लगदा गळतो
4. सुरुवातीच्या अवस्थेत असलेल्या फिक्कट गुलाबी किंवा नंतरच्या अवस्थेतील गडद तपकिरी रंगाच्या अळी फळांमध्ये आढळतात
5. संक्रमित झाडं खाली मोठ्या प्रमाणात आंबे गळालेले बघायला मिळतात
6. पूर्ण वाढलेल्या पतंगांचे पुढील पंख गडद तपकिरी रंगाचे तर पाठीमागील पंख राखाडी रंगाच्या असतात.
आंब्यामधील फळ पोखरणाऱ्या अळीचे जैविक नियंत्रण
जर तुम्ही नैसर्गिक शेती करत असाल व तुम्हाला आंब्यावरील या अळीचे जैविक नियंत्रण करायचे असेल तर तुम्ही निम ऑइल सात दिवसांच्या अंतराने आंब्याला बहार आल्यापासून दोन महिन्यासाठी फवारणी करू शकता.
तसेच जैविक नियंत्रणामध्ये आपण परभक्षी कीटकांचा उपयोग करू शकतो ज्यामध्ये Rychium attrisimum, Trichogramma chilonis, Trichogramma chilotreae यांचा उपयोग करू शकतो.
आंब्यामधील फळ पोखरणाऱ्या अळीचे रासायनिक नियंत्रण
जर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल तर आपण रासायनिक नियंत्रण पद्धतीचा उपयोग करू शकतो ज्यामध्ये thiacloprid रासायनिक घटक असलेल्या कीटकनाशकांमुळे फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण केले जाऊ शकतो. त्याचप्रमाणे क्लोरोपायरीफॉस रासायनिक घटक असलेल्या कीटकनाशकांचा उपयोग केला तर आंब्यामधील फळ पोखरणाऱ्या अळीपासून सुटका होऊ शकते.
तुम्हाला हे देखील वाचायला नक्की आवडेल:
1. डाळिंबावरील तेल्या रोगाची लक्षणे व उपाय योजना
3. वांग्याची फळे पोखरणाऱ्या अळीवर उपाय
4. मकाच्या गुलाबी खोड अळीची लक्षणे व उपाय
जर तुम्ही पहिल्यांदा आमचा लेख वाचत असाल तर येथे क्लिक करून आम्हाला व्हाट्सअप वर जॉईन करा
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा