सध्या महाराष्ट्र मध्ये ठीक ठिकाणी आरक्षणासाठी साखळी उपोषण केले जात आहे तेव्हा आपल्या मनात प्रश्न पडू शकतो की साखळी उपोषण म्हणजे काय? म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण साखळी उपोषण विषयी माहिती जाणून घेऊया.
साखळी उपोषण म्हणजे काय
साखळी उपोषण हे एक उपोषणाचा प्रकार आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने काही काळ उपोषण केल्यानंतर दुसरा व्यक्ती उपोषण करतो त्यामुळे उपोषण करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते.
कोणत्याही प्रकारचा हिंसाचार न करता विविध सामाजिक तसेच अन्य मुद्द्यांकडे सरकारचे तसेच सरकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण केले जाते. साखळी उपोषण हे विविध कारणांसाठी केले जाऊ शकते.
साखळी उपोषणाचे प्रकार
साखळी उपोषणाचे अनेक प्रकार आहेत त्यातील काही सामान्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:
एकाच ठिकाणी साखळी उपोषण: जेव्हा अनेक व्यक्ती एका निर्धारित ठिकाणी येऊन उपोषण करतात तेव्हा ते एकाच ठिकाणी केले जाणारे साखळी उपोषण असते. संबंधित उपोषणामध्ये सरकारी कार्यालय, तसेच अधिकारी कार्यालय समोर साखळी उपोषण केले जाते.
विविध ठिकाणी साखळी उपोषण: विविध ठिकाणी एकाच कारणासाठी उपोषण केले जाऊ शकते. एका समान उद्दिष्टासाठी असे साखळी उपोषण केले जाते. सामाजिक मागण्यांसाठी हे उपोषण केले जाते.
प्रतिनिधी साखळी उपोषण: जेव्हा उपोषणकर्त्या व्यक्तींच्या गटाच्या नेतृत्वात एक प्रतिनिधी किंवा अनेक प्रतिनिधी साखळी उपोषण करत असतात तेव्हा त्याला प्रतिनिधी साखळी उपोषण असे म्हटले जाऊ शकते.
साखळी उपोषणाचे फायदे
साखळी उपोषणाचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही फायदे खालीलप्रमाणे आहेत:
साखळी उपोषणाच्या माध्यमातून समाजातील काही विशिष्ट मुद्द्यांवरती जागरूकता वाढवली जाते व त्यामुळे समाजात क्रांतिकारी बद्दल घडवून आणले जाऊ शकतात.
जर सरकार कडून एखादा चुकीचा निर्णय घेतला गेला तर साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला विरोध केला जातो व संबंधित चुकीचा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणला जातो.
सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी देखील साखळी उपोषण एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते समाजातील विशिष्ट अनिष्ट चालीरीती ला विरोध करण्यासाठी साखळी उपोषण केले जाऊ शकते त्यामुळे सामाजिक स्तरावर बदल घडवून येतात.
साखळी उपोषणाचे तोटे
साखळी उपोषणाचे काही तोटे देखील आहेत. त्यापैकी काही तोटे खालीलप्रमाणे आहेत:
साखळी उपोषण करत असणाऱ्या व्यक्तीस आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
काही देशांमध्ये साखळी उपोषणाला अवैध ठरवले गेले आहे ज्यामुळे संबंधित देशात साखळी उपोषण केल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
कधी कधी एखाद्या चुकीचा निर्णय मान्य करून घेण्यासाठी जर साखळी उपोषण केले जात असेल तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात व अशा वेळेस साखळी उपोषण निरोपयोगी ठरू शकते.
भारतामधील साखळी उपोषणे
राजकीय तसेच सामाजिक चळवळीसाठी भारतामध्ये साखळी उपोषणाचा उपयोग केला जातो. साखळी उपोषण हे विना हिंसाचार सरकारकडून मागण्या मान्य करून घेण्याचे प्रभावी साधन असल्याचे भारतामध्ये दिसून येत आहे.
साखळी उपोषणाचे काही उदाहरणे
2023 मध्ये, मराठा समाजाद्वारे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण केले जात आहे.
शेतकरी कृषी कायद्या विरोधात 2021 मध्ये साखळी उपोषण केले गेले
नोकरीच्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी बेरोजगार तरुणांकडून 2020 मध्ये साखळी उपोषण केले गेले.
सारांश
आंदोलन करत असताना साखळी उपोषण हे एक प्रभावी माध्यम आहे परंतु सगळे उपोषण करत असताना आपण आंदोलनकर्त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे असते तसेच योग्य आणि विना हिंसाचार पद्धतीने साखळी उपोषण केल्यास निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात.
हे पण वाचा:
जलसंपदा विभाग भरती अभ्यासक्रम 2023 PDF, संपूर्ण अभ्यासक्रम माहिती
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा