Soyabean Pest: महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची लागवड केली जाते व महाराष्ट्र मधील सोयाबीन सध्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे आणि याच अवस्थेमध्ये सोयाबीन वरती मोठ्या प्रमाणात चक्रीभुंगा या खोडकिडीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण चक्रीभुंगा या खोडकिडी विषयी माहिती जाणून घेऊ या व त्याविषयी प्रतिबंधात्मक उपाय काय करायचे हे माहिती करूया.
सोयाबीन वरील चक्रीभुंगा ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे की जर सोयाबीनचे संपूर्ण झाड हे हिरवे असेल व त्याची एखादी फांदी किंवा पान हे वाळलेले असेल तर त्यावरती चक्रीभुंगा प्रादुर्भाव असू शकतो. या झाडांना नीट बघितले तर त्यावरती गोलाकार किंवा चक्राकार काप दिसतो त्यावरून आपण संबंधित सोयाबीन झाडावरती चक्रीभुंगा प्रभाव झाला आहे हे ओळखू शकतो.
सोयाबीन वरती चक्रीभुंगा या खोडकिडीचा प्रादुर्भाव होतोच त्याशिवाय आपल्याला वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव देखील बघायला मिळू शकतो ज्यामध्ये शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी, तंबाखू वरील पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव बघायला मिळू शकतो. या सर्व किडींना एकच प्रकारचे कीटकनाशक लागते कारण सर्व किडी या पतंगवर्गीय कीड प्रमाणात येतात.
सोयाबीन वरील किडींचे रासायनिक नियंत्रण | Soyabean Pest Management
चक्री भुंगा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वरती नमूद केलेल्या अळींसाठी आपण इमामेक्टिन बेंजोएट, thimethaxom + lambda , chlorantraniliprole 18.5 sc, lambda cyhalothrin, acetamiprid हे केमिकल कंटेंट असलेले रासायनिक कीटकनाशक वापरू शकतो. विविध ब्रँड नुसार औषधाचे नाव वेगवेगळे असते त्यामुळे औषधाचा कंटेंट चेक करून औषध घ्या. तसेच वरती दिलेल्या कीटकनाशकांच्या कंटेंट मधील कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा उपयोग करावा.
हे वाचा : कपाशीवरील पाते गळती उपाय
सध्या महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची कमकरता जाणवत आहे त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन येणे तग धरून राहण्यासाठी आपण 1% पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच 13:00:45 या खताची 100 ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी प्रमाणामध्ये घेऊन फवारणी करावी.
अशाच नावीन्यपूर्ण शेती विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व अजून एखाद्या कोणत्या पिकाची माहिती हवी असेल किंवा शेती विषयक अन्य माहिती हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद.
हे पण वाचा:
वांगी पिकावरील तपकिरी तुडतुड्यांची लक्षणे व नियंत्रण
हुमणीच्या नियंत्रणासाठी करा हा सोपा उपाय
मकाचे कणसे पोखरणारी अळी (लष्करी अळी) ची लक्षणे आणि व्यवस्थापन
शेतीविषयक बातम्या, हवामान अंदाज, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी इथे क्लिक करा